शरद ऋतूचे आगमन होता ….
झळकत येतो अश्विन मास !!
तरुणाईच्या जल्लोषात अन ….
थोरांचा तो जागरहाट !
घट बसता नवरात्राचे
प्रतिपदा ते नवमीचे !!
सज्ज झाली महिषासुरमर्दिनी…
असुरांचा वध तो करावया
अखंड दीप हे प्रतीक असे …..
शक्ती अन त्या वायूचे !!
लहरी त्याच्या दाही दिशातही …..
घननीळा त्या बरसतात !
नवरात्रीचे नऊ रंग हे ,
बहरत जाती चोहीकडे !
नेवेद्याचा थाटमाट तो ,
पुरणा – वरणाचा
घरोघरी सुटे घमघमाट
पंचपक्वानाचा !!
मान मिळे तो कुमारिकेला …
नवरात्री ती देवीसम भासे
गरबाचा गजर अन ठेका,
गोलाकार घट मंडल असे
पाठ करुनी सप्तशतीचे ,
करुणा भाकू भक्तीची!!
हे देवी ज्ञान मिळू दे …
त्या विद्येचे अन विज्ञानाचे
दुःख दूर सार , ……
विनाश अन दारिद्र्याचे
महालक्ष्मी , महासरस्वती , महाकाली
अशी अनेक रुपी तुझी सम भासे !!
दशमीचा तो दिवस उजाडे
दसरा सण मोठा ,
नाही आनंदाला तोटा !!
पूजन करूनी शस्त्र …व
सरस्वतीचे ….
सीमोल्लंघन अन शमीपूजनाचे !!
सोने लुटूया आपट्याचे ,
आनंदाचे अन एकोप्याचे !
एकच ध्यास तो हिंदुत्वाचा
दरवळ भासे चोहीकडे !!
© ** राज **
सौ . राजश्री भावार्थी
सिंहगड रोड, पुणे
https://www.facebook.com/rajashri.bhavarthi
Leave a Reply