कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
न ऐकीली कधीही हाक तयाची कानी,
चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी,
निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले
प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले,
नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले
तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला
कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला,
तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply