बॉलिवूडमधील चरित्र अभिनेता ओमप्रकाश यांचे पूर्ण नाव ‘ओम प्रकाश बक्शी’ होते. ओमप्रकाश यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ रोजी झाला. शिक्षण लाहोर मध्ये.
त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. १९३७ मध्ये ओमप्रकाश ‘ऑल इंडिया रेडियो सिलोन’ मध्ये २५ रुपये वेतनावर नोकरी करत होते. रेडियो सिलोन वर त्यांचा ‘फतेहदीन’ हा कार्यक्रम लोकप्रिय होता.
ओमप्रकाश यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केली. त्यांच्या प्रमुख चित्रपटात ‘पड़ोसन’, ‘जूली’, ‘दस लाख’, ‘चुपके-चुपके’, ‘बैराग’, ‘शराबी’, ‘नमक हलाल’, ‘प्यार किए जा’, ‘खानदान’, ‘चौकीदार’, ‘लावारिस’, ‘आंधी’, ‘लोफर’, ‘ज़ंजीर’ यांचा समावेश आहे ‘कोणीही’ वादळ ‘,’ भटक्या ‘,’ जंजीर ‘, त्यांचा ‘नौकर बीवी का’ थी हा चित्रपट होता.
अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यांचे खूप छान ट्युनिंग होते. ‘नमक हलाल’ मधील दद्दू व ‘शराबीतील’ मुंशीलाल या व्यक्तिरेखानी ओमप्रकाश यांनी कमाल केली होती. देव आनंद यांना कोणतीही चित्रतारका ‘भैय्या’ असे म्हणत नाहीत, पण आपणाला मात्र त्या अगदी तरूण वयात असल्यापासून ‘भैय्या’ म्हणतात अशी तक्रार चरित्र अभिनेता ओमप्रकाश अनेकदा करीत असत.
ओमप्रकाश यांचे निधन २१ फेब्रुवारी १९९८ रोजी झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply