रेशीम धागा जेवढा ओढावा
तेवढा तो गुतंतो
मनातील विकल्पाचेही तसेच आहे
जितकी ओढाताण तितकी गुंतागुंत
मनातील विकल्प काव्यलेखन करतांना सहजपणे उमटतात. तसं तर काव्यलेखन ही मधूर समाधी आहे. काही क्षणासाठी का होईना पण जीवनातली सारी दुःखे ,दुःखाच्या सा-या जखमा आणी जखमांच्या सा-या वेदना विसरायला लावणारी ती एक प्रभावी शक्ती आहे. सुदैवाने तू त्या शक्तीशी परिचीत आहेस.
खरोखरचं तू एक ध्येयवेड़ा,प्रितीवेड़ा आहेस. तुझी माझ्याविषयीची प्रितीनिष्ठा कवितेच्या पाकळ्यात सुगंधासारखी कुप्पीत सुरक्षित ठेवली आहेस. या पाकळ्यांना जपून ठेवशील ना? नक्कीच जपून ठेवशील पण ……….कधी कधी दूर झाड़ाआड़ून झगमगत्या केशरी किरणांमूळे तेजस्वी सूर्याची किनारही दिसत नाही.
मग अशावेळी मनाला सांशकता घेरून येते .आणी मनाला वाटतं सूर्य अस्ताला तर नाही ना निघाला ?
समजतंय का तूला ……………समजायला हवचं रे
© वर्षा पतके- थोटे
7-01-2019
Leave a Reply