एका संघाचा फलंदाजीचा एक डाव असा होता :
अॅटकिन्स ६ धावा
बॉडकिन्स ८ धावा
डॉकिन्स ६ धावा
हॉकिन्स ६ धावा
जेनकिन्स ५ धावा
लार्किन्स ४ धावा
मिकिन्स ७ धावा
पर्किन्स ११ धावा
सिम्किन्स ६ धावा
टॉमकिन्स ० धावा
विल्किन्स १ धाव
अवांतर धावा शून्य.
एकूण सर्वबाद ६०.
गोलंदाजी :
पिचवेल १२.१ षटके, २ निर्धाव, १४ धावा, ८ बळी.
स्पीडवेल ६ षटके, ० निर्धाव, १५ धावा, १ बळी.
टॉसवेल ७ षटके, ५ निर्धाव, ३१ धावा, १ बळी.
हा सामना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता :
- या सामन्यात धावा फक्त एकेरी धावा आणि चौकार या स्वरुपातच आल्या.
- कोणताही खेळाडू झेल घेऊ शकला नाही, कुणीही नो-बॉल टाकले नाहीत किंवा कुठेही शॉर्ट रन झाली नाही.
- स्पीडवेल आणि टॉसवेल यांनी एकाच हप्त्यात गोलंदाजी केली.
- पिचवेलने डावातील पहिला चेंडू टाकला- फलंदाज होता अॅटकिन्स. स्पीडवेल हा दुसरा सलामीचा गोलंदाज होता.
- प्रत्येक षटकात सहा चेंडू होते.
एवढ्या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या :
- स्पीडवेल आणि टॉसवेलला कुणाचे बळी मिळाले?
- नाबाद कोण राहिले?
- प्रत्येक गडी बाद होताना संघाची धावसंख्या काय होती?
संदर्भ : दी आर्ट ऑफ क्रिकेट– सर डोनल्ड ब्रॅडमन (पुस्तकात उत्तर मात्र नाही.)
Leave a Reply