MENU
नवीन लेखन...

कलियुगातील कंस

भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगात अवतार धारण करून दुष्ट कंस आणि अनेक तत्सम विघातक प्रवृत्ती नष्ट केल्या. मात्र कलियुगात या प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढू लागल्या असून गरीबांना लुटण्याचे उद्योग त्या सर्रास करीत आहेत. मनीलँड्रिंग या व्यवसायात या प्रवृत्ती कार्यरत असून राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्र राज्य शासनाने या प्रवृत्तीच्या विरोधात कारवाईसाठी ठोस पावले उचलली आहेत. अर्थात ही गरीबांच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे. सीआयडी विभागानेही या दुष्टप्रवृत्तींची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सुरू केलेले काम अभिनंदनीय आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागांत एका कुटुंबाच्या मालकीची शेकडो एकर जमीन, प्लॉट, फ्लॅट अशा स्थावर मालमत्तेसह शहरात सोन्याचे भव्य शोरूम, चास येथे पेट्रोलपंप ही सारी चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ही मालमत्ता अवघ्या चाळीस ते पन्नास वर्षांत या कुटुंबाने कशी जमविली, हा खरा प्रश्‍न आहे. निश्‍चितच ही मालमत्ता स्वकष्टातून किंवा प्रामाणिकपणे घाम गाळून अशी उभी करता येणे केवळ अशक्य आहे. संबंधित कुटुंबियाच्या चास येथील पेट्रोलपंपावर भेसळीचे पेट्राल विकून वाहनधारकांच्या डोळ्यात धूळङ्गेक करण्याचा हा डाव किती दिवस चालेल, यातून गोळा केलेला काळा पैसा ही मंडळी मेल्यानंतर स्वतःबरोबर नेणार आहेत का, याचा विचार संबंधितांनी करण्याची खरी आवश्यकता आहे. गरीबांना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अडाणीपणाचा गैरङ्गायदा घेत त्यांना दिलेल्या पैशांच्या माध्यमातून त्यांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेण्याची प्रवृत्ती म्हणजे दुसरी तिसरी कशाची नसून कंसाचीच आहे. अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना ठेचण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने भगवान श्रीकृष्णांचे अनुसरण करावे, अशी तमाम गरीब जनतेची अपेक्षा आहे. अहमदनगर जिल्ह्यात मनीलँड्रिंग व्यवसायाद्वारे कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणार्‍या या कंसांच्या बांधवांना मृत्यूनंतर नरकात नक्कीच जागा मिळणार नाही. त्यांच्या सातच नव्हे तर अनेक पिढ्या बरबाद होतील, असा सत्यचवनी, प्रामाणिक ईश्‍वरभक्त गरीब समाजबांधवांचा या नराधम लोकांना शाप आहे.

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..