नवीन लेखन...

भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम

सृष्टीचे सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांविषयी निराकारवाद्यांनी केलेली घोडचूक म्हणजे ते समजतात, की भगवंतांचा अवतार होतो, तेव्हा त्यांचे ते रुप पंचभौतिक असे सत्वगुणयुक्त असते. वस्तुतः श्रीकृष्णरुप किंवा नारायणरुप कोणत्याही कल्पनेच्या मर्यादित नाही. इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए.सी. भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या मते निराकारवाद्यांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्यांनीदेखील भौतिक सृष्टीच्या अतित असणार्‍या भगवंतांचे अस्तित्व मान्य केले आहे. प्रभुपाद म्हणतात, की भौतिक सृष्टीचे कारण अव्यक्त प्रकृती आहे आणि भगवान श्रीकृष्ण या भौतिक सृष्टीच्या पलीकडे दिव्यस्वरुपी आहेत. श्रीमद्‌भागवत ग्रंथात हे शुद्ध-सत्व म्हणून वर्णित झाले आहे. ते प्राकृतिक सत्वगुणांच्या संसर्गातही येत नाहीत. ते प्राकृतिक सत्वगुणाच्या स्थितीच्या पलीकडे आहेत. ते सच्चिदानंदस्वरूपी आहेत. निर्विशेषवादी लोकांना भगवंतांची अनेक नावेे किंवा रुपे ही आपल्या विशिष्ट कार्यांंप्रमाणे व गुणांप्रमाणे आहेत, असे वाटते. ते भगवंतांकडे एका भौतिक निरीक्षकाच्या भूमिकेतून पहात आहेत. मानसिक तर्काने भगवंतांचे परमस्वरूप आणि लिला यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न म्हणजे काही वास्तविक जाणिवेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नव्हे. मनुष्याने स्वतःला भगवंतांच्या प्रेममय, भक्तीमय सेवेत संलग्न करायला हवे. तेव्हाच तो भगवंतांचे परमस्वरुप, दिव्यनाम, रुप-गुण आदी जाणू शकतो. भगवंतांविषयी लाखो वर्षे तर्क करीत बसले तरी त्यांच्या वास्तविक स्थितीचा एक अंशही जाणणे आपल्याला शक्य होणार नाही. भगवंतांना अभक्तांद्वारे कधीही जाणले जाऊ शकत नाही. भगवंतांनीच वैदिक ग्रंथांत सांगितले आहे, की मी सर्वांसाठी प्रकाशित होत नाही. केवळ आंबा आंबा आंबा असं म्हटल्यास प्रत्यक्षात त्याची चव कळणार नाही. मात्र भगवद्‌भक्त हे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे या दिव्य महामंत्राद्वारे स्वतःला सदैव भगवंतांच्या संगतीत असल्याचा साक्षात्कार करतात. इस्कॉनचे कृष्णभक्त अगदी कडक हिवाळ्यातही पहाटे लवकर उठून थंडगार पाण्याने स्नान करून मंगल आरती, भगवंतांच्या श्रीविग्रहांची सेवा, श्रीमद्‌भागवत क्लास आदी प्रामाणिकपणे न चुकता करतात. खरे तर हाच खर्‍या अर्थाने पुरुषार्थ आहे. सर्व सुखाची कामना सोडून भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ्य संपूर्ण जीवन समर्पित करणे ही साधी-सुधी बाब नाही.  इस्कॉनच्या सर्वच कृष्णभक्तांना साष्टांग दंडवत प्रणाम.

— बाळासाहेब शेटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..