नवीन लेखन...

डिसेंबर २० : बिल ओरेली आणि ब्रॅडमन-ओरेली शीतयुद्ध

 

‘बिल’ ओरेली या नावाने सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या, टायगर अशीही उपाधी असलेल्या आणि विल्यम जोसेफ ओरेली हे मूळ नाव असणार्‍या एका सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियाई फिरकीपटूचा जन्म २० डिसेंबर १९०५ रोजी झाला. क्रिकेटिहासातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक अशी बिलची नोंद इतिहासकारांनी घेतलेली आहे.

दोन बोटांच्या साहाय्याने चेंडू वैशिष्ट्यपूर्णरीत्या पकडून, जवळपास मध्यमगती गोलंदाज करतात तितक्या वेगाने बिल फिरकी गोलंदाजी करी. अ‍ॅक्शनमध्ये लक्षात येण्याजोगा बदल न करता तो गुगली, लेगब्रेक्स आणि टॉपस्पिनर्स टाकी.

बिलची शारीरिक उंची एखाद्या कॅरिबिअन वेगवान गोलंदाजाला शोभण्यासारखी होती. चेंडू टाकताना त्याचा हात बराचसा खाली रहात असल्याने त्याच्या चेंडूच्या उंचीचा अंदाज घेणे मुश्किल असे.

हे सर्व लक्षात घेता त्याचे वर्णम वेगवान गोलंदाजाच्या आक्रमकतेने कंदुकफेक करणारा फिरकीपटू असे केले जाते.

अठरा हंगामांच्या आपल्या प्रथमश्रेणी कारकिर्दीत ओरेलीने १६.६ च्या सरासरीने ७७४ गडी बाद केले. सत्तावीस कसोटी सामन्यांमधून त्याने २२.५९ च्या सरासरीने १४४ गडी बाद केले. या १४४ पैकी १०२ इंग्लिश बळी होते.

ओरेली आणि ब्रॅडमन यांच्यातील शाब्दिक संघर्षही खूपदा चर्चिला गेला आहे. तत्कालीन ऑस्ट्रेलियाई समाजात कॅथलिक्स आणि प्रॉटेस्टंट्‌स अशी वर्गवारी होती. कॅथलिक्स हे आयरिश वंशाचे (ओरेली हे उदाहरण) आणि ब्रॅडमन हे प्रॉटेस्टंट. ब्रॅडमनांना मद्य वर्ज्य असल्याने आणि स्वभावानेच ते शांत असल्याने साहजिकच संघभाऊ आणि ब्रॅडमन यांच्यात एक अंतर असे. इतर खेळाडू ड्रिंक्स वगैरे घेत असताना ब्रॅडमन काहीतरी वाचत बसणे पसंत करीत. १९४० च्या दशकारंभी ओरेली, स्टॅन मॅक्केब, लिओ ओब्रायन आणि चक फ्लीटवूड-स्मिथ (सगळे आयरिश कॅथलिक होते हा योगायोग नक्कीच व्हता) या सर्वांना ऑस्ट्रेलियाई मंडळाने बोलावून घेतले. संघात फाटाफूट झाल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती. जॅक फिंगल्टनलाही बोलावणे यायचे पण तो आता पत्रकार

झालेला असल्याने त्याला आमंत्रण गेले नाही.

फिंगलटन आणि ओरेली यांच्या मृत्यूनंतर ब्रॅडमन यांनी फिंगलटन हा असंतुष्ट गटाचा नेता असल्याचे म्हटले होते. १९९५ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात ब्रॅडमन म्हणतात, “या दोघांना वगळता १९४८ च्या माझ्या संघाची निष्ठा प्रश्नांपलीकडची होती आणि त्यामुळेच माझा संघ जबर्दस्त यश मिळवू शकला.” (१९४८ चा हा संघ इंग्लंड दौर्‍यात एकही सामना हरला नव्हता.)

ओरेलीही नंतर पत्रकार झाला आणि फिंगलटन-ओरेलीने अनेकदा ब्रॅडमनवर टीका केली. ब्रॅडमन आपल्या शेवटच्या कसोटी डावात शून्यावर बाद झाले तेव्हा हे दोघे प्रेस बॉक्समध्ये होते आणि हसून हसून त्यांच्या मुरकुंड्या वळल्या होत्या. ओरेलीने आपल्या तीव्र भावना स्वतःजवळच ठेवल्या, आत्मचरित्रातही त्या येऊ दिल्या नाहीत. याबाबत छेडले असतात त्याचे उत्तर असे, “पुतळ्यांवर लघुशंका करायची नसते.”

एवढे असूनही आपल्या मृत्यूपूर्वी (६ ऑक्टोबर १९९२) ब्रॅडमन यांच्या फलंदाजीसमोर आजकालचे फलंदाज म्हणजे कच्चेबच्चे वाटतात असे ओरेलीने लिहिले आहे.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..