आऽऽरोपाची वास्तव गंमतच न्यारी
लागवडीत याच्या घ्यावी खबरदारी
जनसेवेचे आश्वासित रुप लई भारी
खाजगी पिकास लाभे जमीन मात्र सरकारी
आवाजात दृढताशंखनाद नि तुतारी
सत्यअसत्यातून फक्त संकल्पच तो भारी
खेळापूर्वीच निकालाची परंपराही सारी
रगडिता कण मिळे फक्त चौकशीचीच वारी
होवो मग दंगे जाळपोळ नि हाणामारी
कवचात संरक्षणाच्या घेती उंच उंच भरारी
स्मरावे विधात्याचे नाव ते चमत्कारी
वसातोशांतीचादेप्रकटूनी अवतारी
— इकबाल सईद काझी
Leave a Reply