यातना आणि वेदना,
जीवन दुसरे असते काय,
भोग आणि उपभोग,
असे त्याचे दोन पाय ,,–!!!
स्वार्थ अन् भांडण,
हेच त्याचे अवयव,
कधीकधी फक्त कींव,
कधीकधी चांगुलपण, ,–!!!
दया करुणा उपकार,
सारेच जीवन विसरले,
म्हणूनच आज सगळ्यांना,
जीव न-कोसे करणारे,–!!!
समस्या अडचणी यांचा,
त्याभोवती घेराव ,
कसे कुणाला ठाऊक,
करेल कधी संपूर्ण पाडांव,–!!!
असेना का तरीही,
त्यातच मजा आहे ,
रडके तोंड करण्यापेक्षा,
हसरे गाणे प्रिय आहे,–!!!
माणुसकी आणि सर्व भावना,
आज निषिद्ध आहेत,
स्वतःच्या पोळीवर तूप ओढणे,
एवढेच शिल्लक आहे ,–!!!
पैसा, सत्ता ,लालसा,
यांचीच सारी ओढ,
त्यांच्यात लागते सारखी,
मात देण्याची ओढ,–!!!
पण असे असूनही
मन सुद्धा मरते,
जिवंत असून मन मेलेले,
माणूस हे सिद्ध करे,–!!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply