Right to disconnect….!
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी अलीकडेच एक अत्यंत महत्वाचे विधेयक लोकसभेत मांडले .हे एक खासगी विधेयक होते .त्या विधेयकाचे नाव होते Right to disconnect.या विधेयकावर सोशल मिडीयावर फार चर्चा झाली नाही आणि बातम्यांमध्ये सुद्धा हे विधेयक जरा दुर्लक्षित राहीले .खरेतर या विधेयकावर दूरदर्शन वर विशेष चर्चा व्हायला हवी होती पण ती झाली नाही.
काय आहे हे विधेयक ……..!
आजकाल तरुण IT मध्ये नोकरीला लागलेली मुले त्यांच्या ऑफिस मधून खूप उशिरा घरी येतात .दिवस भर ऑफिस मध्ये काम केल्यावरही त्यांचा बॉस घरी त्यांचा छळ सुरूच ठेवतो.सतत रात्री बे रात्री मेल पाठवणे .फोन करून माहिती घेणे .मेसेज पाठवून त्याची उत्तरे मागवणे हे प्रकार चालू असतात.नोकरी जाण्याच्या भीतीने हे तरुण सतत बॉस च्या या माऱ्याने मेटाकुटीला येतात.सतत online राहणे आणि बॉस च्या संपर्कात राहणे हे आता अत्यंत साधारण बाब झाली आहे. target achieve करायचे आहे असे सतत चे दडपण त्यांच्या मनावर असते.घरी आल्यावर ही मुले नीट जेवत नाहीत .कुटुंबा बरोबर नीट बोलत नाहीत .सतत कसल्यातरी तणावा खाली असतात.रात्र रात्र त्यांना झोप नसते.हा प्रकार हल्ली सर्रास चालू आहे.
नोकरीची हमी नाही .युनियन वगैरे यांचा पाठींबा नाही.बॉस ला नाखूष केले तर मध्यरात्री सुद्धा मेल पाठवून “उद्या येताना laptop घेवून या ” आणि दुसरी नोकरी शोधा असे सांगितले जाते.या सर्व तणावा मुळे तरुणांच्या जीवनातला आनंद हरपून गेला आहे.लग्न झाल्यावर हनीमून साठी जाताना ऑफिस चा laptop घेवून जाणारी आणि online राहून ऑफिस च्या संपर्कात राहणारी तरुण मुले दिसायला लागली आहेत.
हा प्रकार अत्यंत भयानक आहे.अनेक तरुणांना अगदी २५ /३० वर्षाच्या वयात उच्च रक्तदाब ,मधुमेह ,मानसिक व्याधींनी ग्रासलेले आहे.त्यांना आजूबाजूच्या जगात काय चालले आहे त्याची जाणीव नसते .खेळ आणि मनोरंजन यांना ते मुकलेले असतात.आणि समाजातील खूप मोठ्या संख्येने बुद्धिमान मुलांना या तणावाचा सामना करायला लागत आहे.
हा विषय युरोप आणि अमेरिकेत अत्यंत गंभीर पणे हाताळला जात आहे.त्या देशांना त्याच्या तरुण पिढीला या चुकीच्या work culture पासून वाचवायचे आहे .
आपल्या देशात खासदार सुप्रिया सुळे यांनी या विषयाला वाचा थेट संसदेत फोडली आहे.या साठी तातडीने कायदा करण्याची गरज आहे.या विषयावर समाज माध्यमात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली पाहिजे .
काही लबाड तरुण या परिस्थितीचा फायदा पण घेतात.कामाच्या वेळात काम न करता ऑफिस ची वेळ संपल्यावर ऑफिस मध्ये काम करण्याचे नाटक करतात.बॉस वर इम्प्रेशन मारतात आणि बढती पण पदरात पडून घेतात.हा चुकीचा पायंडा पडत आहे.हे कुठे तरी थांबायला पाहिजे. ऑफिस चे काम ऑफिस च्या वेळातच पूर्ण करून नंतर त्या तरुणांनी आपल्या कुटुंबा बरोबर आपला वेळ व्यतीत केला पाहिजे.
या देशाच्या तरुण पिढीला वाचवणे गरजेचे आहे . त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे अभिनंदन ……!.खासदार असाच अभ्यासू असला पाहिजे.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply