नवीन लेखन...

करलो दुनिया मुठ्ठिमेचा अर्थाअर्थी अर्थ

ज्येष्ठ दादा अंबाणी हे चिकन बिझेनसमध्ये जाणार असल्याचं आतापर्यंत समस्त चिकन्या -बिकन्या मिस्टर ऍ़ण्ड मिसेस कोंबडी-कोंबडेराव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासह आपल्या-तुपल्या कर्नपटलावर आले असेलच. कुणी कोणता बिझिनेस करावा हा ज्यांच्या त्यांच्या प्रश्न. म्हणजे  बॅगपायपरवाले विजयराव मल्या जर विमान उडवू शकतात आणि नंतर बुडवू शकतात तर अनंत उद्योगी ज्येष्ठ दादा अंबाणी एज्युकेशन ते क्रिकेट ते किराणा दुकान सॉरी मॉल ते चिकन बिझिनेस असा प्रवास करणे अपेक्षितच होते.

ज्येष्ठ दादा अंबाणी चिकन बिझिनेसमध्ये उतरल्याने ज्या अभिजनांना सारं काही ब्रँडेडच हवं असतं आणि जे त्यांचं स्टेटस सिम्बॉल असतं त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. पुण्यातल्या अभिजनांसाठी खाईन तर चितळेंचीच बाकरवडी अन्यथा नो वे. म्हणजे असं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी,अशी ब्रँडेडच हवं असं वाटणाऱ्यांची किमान चिकनच्या बाबत तरी (दाखवण्यापुरती )सध्यस्थिती आहे. ओशो सुध्दा म्हणायचे आम्ही ब्रँडेड प्रिय अभिजनांचे मार्गदर्शक. ब्रँड कसा बाहेरून चकाचक.ग्लॅमरस वगैरे असतो.ते अभिजनांना क्लास वाटतं.वूडलँडचा बूट दोन महिन्यात वाकुल्या दाखवायला लागला तरी तो ऑफ्टर ऑल ब्रँडेडच ना.(ब्रँडेडला सारं काही माफ असतं.)

त्यामुळे आता जेव्हा ज्येष्ठ दादा अंबाणी यांचे रिलायन्स चिकन जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा अभिजनांची क्लासिकल भूक रोमांचित होईल. आतापावेतो त्यांच्या उदरी चिकन गेली असली तर त्यावर ब्रँडचा स्टॅम्प नव्हता .उदरी पडलं नि पवित्र झालं,असच त्या चिकनकडे बघितलं जायचं. मग ती मूर्गी भाम्रागडची गावठी असो नाही तर परभणीची ब्रायलर असो. घर की मूर्गी दाल बराबर,असं त्यांचं नशिब होतं. पण,ब्रँड रिलायन्सचं कुंकू लागल्यावर या चिकन जणू पॅरिसच्या लॉ मोंदे वगैरे नामक रेस्त्राँ मधल्या ए वन दर्जाच्या इंग्लिश विंग्लिश कोंबड्या जणू आपल्या उदरी गेल्याचा परमानंद त्यांना लाभेल. त्याजरी उल्हासनगरमधून निर्यात झाल्या असल्या तरी.

ब्रँडचा महिमा असा असतो न्यारा. रामसे चित्रपटातील समूह नृत्यात नाचणारी नटी एक्स्ट्रा असते,मात्र जेव्हा सुभाष घईच्या चित्रपटातील समूह नृत्यात नाचते तेव्हा ही नटी ऍ़क्ट्रेस बनते. अगदी तसच हे आहे. दादा अंबांणीं यांच्यामुळे हे भाग्य देशी चिकनला आता प्राप्त होत आहे. प्रत्येक कुत्र्याचा आणि सासूचा एक दिवस असतो असं अनंत वर्षापासून अनंत लोक सांगत असतात.आता त्याच्यामध्ये चिकनचाही समावेश होत आहे.

गावठाणातच आपल्या पिल्ल्या-टिल्यांसोबतच खुष असणारी कोंबडीत्त्या आता चिकन मॅडम होणार आहे.स्वप्न माणसाला पडतात त्यांनी ते चिकनसारख्या क:पदार्थ प्राण्यांना मोठं करुन टाकतात,असं रिलायन्स चिकनमुळे घडेल.(गिरचा सिंह मोठा होताच पण त्या गिरमध्ये अमिताभ बच्चन यांना पाठवून त्याचं मोठेपण सांगण्याचं स्वप्न क्रिएटिव्ह डायरेक्टरला पडलं नि गिरचा सिंह आणखी मोठा झाला.ब्रँडेड झाला.तस्सं.) जे व्हेजेटेरिनियन अभिजन आम्ही स्पाघेट्टीच वा मॅगीच्च खात्तो असं उच्चरवानं सांगत त्यांना आता नॉनव्हेजेटेरियन अभिजन आम्ही रिलायन्स चिक्कनच खातो असं मिटक्या मारत अभिमानाने सांगू शकतील. त्यांच्याकडे आतापावेतो पामेरियन वगैरे ब्रँडेड पपी म्हणजे डॉगी होता.मर्सिडिज बेंज अथवा रोल्स रॉयल्स होती. रोलेक्स वॉच होती, इटालीयन मार्बल होते. विंडसर शॅम्पेन होती,पिटर इंग्लंड सूट होता.फक्त कमतरता चिकनची होती.ती आता रिलायन्स चिकनमुळे भरुन पावणार.

प्रगतीचा हा पुढचा टप्पा गाठण्यासाठी ज्येष्ठ दादा अंबाणी सरसावले आहेत.आपल्या साऱ्या देशी-गावठी कोंबड्या आता रिलायन्स चिकनचा साज लेवून इस्लामाबादेत जातील,कोलंबोला जातील, शांघायला जातील.तेल अविवला जातील, महाराणींच्या बंकिगहम पॅलेसमध्ये जातील.ब्रुईनीच्या सुलतानांच्या महालात जातील.वाशिंग्टन मधील व्हाईट हाऊसमध्ये जातील.आपली गावठी कोंबडी आता ब्रँडेड होऊन सर्व जगावर राज्य करेल.

यालाच तर कदाचित करलो दुनिया मुठ्ठीमे असं म्हंटल जात नाही ना..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..