नवीन लेखन...

नितीन गडकरी आणि Route 66

अमेरिकेत Route 66 या नावाचा( राऊट 66 ) अत्यंत लोकप्रिय हायवे आहे.Will Rogers Highway म्हणून सुद्धा हा ओळखला जातो. हा ३९४० किलोमीटर चा हायवे शिकागो पासून कैलिफोर्निया पर्यंत जातो.हा हायवे अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय हायवे झाला होता.सध्या या रस्त्याला ” हायवे ” चा दर्जा नाही.परंतु अमेरिकेतील U.S. Highway सिस्टिम चा पाया ११ नोव्हेंबर १९२६ साली या हायवे मूळे घातला गेला . मी हा हायवे पाहीला आहे. जगभरातील पर्यटक हा हायवे पाहायला येतात. अत्यंत उत्तम स्थितीत हा जतन केला आहे.या हायवेच्या आजू बाजूला असलेल्या टुमदार , अत्यंत सुरेख लहान लहान गावांना या ऐतिहासिक हायवे मूळे विशेष महत्व आले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेला मुंबई –पुणे एक्सप्रेस वे तयार झाला आणि नितीन गडकरी या माणसाकडे लक्ष गेले. आजही त्यांच्या शिरावर संपूर्ण देशाचे रस्ते बांधण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली ती त्यांचे मुंबई–पुणे या रस्त्याचे काम पाहूनच.महाड -पोलादपूरचा ब्रिटिश कालीन पूल कोसळल्या नंतर जी विधान सभेत चर्चा झाली त्याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्या दाखवत होत्या . सरकार मधील कुणीही ” हो या अनर्थाची जबाबदारी आमची आहे” असे स्पष्ट पणे म्हणत नव्हते. पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्गार ऐकले आणि जरा बरे वाटले.

Indian -Route 66

महाड सावित्री नदी पूल दुर्घटनेनंतर आरोप – प्रत्यारोप होत असताना केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाड दुर्घटनेची जबाबदारी ‘ सरकार ‘ म्हणून आमचीच असल्याचं म्हटलं आहे.

१८० दिवसात त्या ठिकाणी नवा पूल बांधणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुंबई – गोवा मार्गाच्या ४ लेनचे काम डिसेंबरपर्यंत सुरु करणार असून येत्या २ वर्षात हा मार्ग पूर्ण करणार असल्याचं नितीन गडकरी बोलले आहेत.
केरळच्या एडापल्लीपर्यंत तब्बल १२६९ किलोमीटरच्या या महामार्गाच्या विकासामध्ये सावित्री नदीने दिलेला भयानक धडा काही बदल करणार का? हा प्रश्‍न आहे.66 क्रमांकाने ओळखला जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग लांबीच्या बाबतीत देशातील सातव्या क्रमांकावर आहे.

चुका झाल्या कि त्याची जबाबदारी घेणे , त्या चुकांपासुन धडा घेणे आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेणे या सर्व गोष्टी सरकारी पदाधिकारी आणि अधिका-यांनी त्यांच्या कामाचा भाग म्हणून स्वीकारल्या पाहिजेत. Hide and Seek चा खेळ विधानसभेत झाला असताना केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचे हे स्पष्ट वक्ते पणाचे उद्गार म्हणूनच मला आवडले.

चिंतामणी कारखानीस —

6 Aug 2016

 

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..