भाग-८ वा.
———-
चैनीखातर शिकणारी मुले आणि उपाशीपोटी राहून शिक्षण घेणारी मुले गुरुजींना पाहण्यास मिळत होती. त्यांना स्वतः:चे दिवस आठवले, “या दिवसांनी गुरुजींना एक शिकवण दिली होती, “विद्यार्जन हे कठीण व्रत असते , त्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतात तेंव्हा कुठे हे विद्याधन प्राप्त करता येते ..! ”
शहरातील एका वकीलमित्राकडे चंदरच्या रहाण्याची सोय करण्याचे ठरले. गुरुजी त्याला म्हणाले –
” हे बघ चंदर , आपण गरजू आहोत, तेंव्हा तडजोडी कराव्या लागतील. माझ्या या मित्राच्या घरी राहून तुला घरातील सर्व कामे करावी
लागतील, यामुळे तुझा प्रश्न तरी सुटेल , हे निश्चित !.
या अटी मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता “, हे चंदरला कळत होते , बापूला जास्त पैसे पाठवणे नेहमी कसे जमणार ?
तेंव्हा शिकवणीसाठी आणि पुस्तकांसाठी लागणाऱ्या पैशासाठी श्रम करावे लागणार ..!
गुरुजी सांगू लागले –
“चंदर , “कमवा आणि शिका ” , या प्रमाणे तू स्वतःच्या पायावर उभा राहून शिकून दाखव.!
यासाठी परिश्रम करावे लागतील, अपमानाचे प्रसंग ही तुझ्यावर येतील पण घाबरायचे नाही. आपण श्रीमंत नाहीत आणि या जगात पैशाच्या
आधाराशिवाय जगणे कठीण आहे.
संकटांशी सामन करीत ,प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तुला मार्ग काढायचा आहे. कठोर परीश्रामाशिवाय
पर्याय नाही ” ,हे नेहमी लक्षात ठेवून वाग , तुला अपयश येणार नाही.
गुरुजींच्या वकील मित्राकडे येऊन चंदरला आता बरेच दिवस झालेले होते. या प्रत्येक दिवसात गुरुजींनी केलेल्या सूचनेप्रमाणे चंदरने आपली वागणूक ठेवली होती.
वकीलसाहेब सांगतील त्याप्रमाणे चंदर घरातली सगळी कामे करीत होता. एव्हढयाने वकीलसाहेब थांबत नव्हते,त्यांच्या ओफिसातील कामे
देखील चंदरला करावी लागत होती. वकिलीन बाईंचे जग तर तर बोलून चालून श्रीमंतांचे ,त्यांच्या जवळ फक्त पैसेवाल्यांना किंमत होती.
चंदर सारख्या गरीब मुलाला आपण पोसतो आहोत “,म्हणजे फार उपकारी आहोत “,ही भावना त्यांच्या बोलण्यात नेहमी जाणवायची.
त्यांच्या मते “यांचे हे समाजकार्य फार महत्वाचे आहे आणि मी ते करते “, इतरांना ही गोष्ट त्या मोठ्या गर्वाने सांगायच्या.
बारावीचा निकाल लागे पर्यंत त्यांच्या घराच्या दृष्टीने चंदर म्हणजे “पैशाने नाडलेला एक गरीब आणि सामन्य मुलगा,
खेड्यातून आलेल्या या
पोराला काय समजणार ? एक आश्रित म्हणून चंदर आपल्या घरात राहतो “, हीच त्यांची नजर होती.
त्यादिवशी मात्र अगदी चमत्कार झाला. मोलकरीण आली नाही, त्या दिवशी न सांगता चंदरने भांडी घासली पाहिजेत “, धुणी धुतली पाहिजे “,
असा नियमच वकीलीनबाईंनी केला होता , या नियमाप्रमाणे भांडी घासून झाल्यावर चंदर बंगल्याच्या आवारात कपडे वाळत घालीत होता.
वर्तमानपत्रात बारावीचा निकाल जाहीर झालेला होता . गुणवंत विद्यार्थ्यांची यादी आणि सोबत त्यांचे फोटो झळकत होते.
या यादीत चंदरचे नाव आणि फोटो पाहून वकीलसाहेब आश्चर्याने थक्कच झाले , एव्हढ्यात स्वतहा प्राचार्य आणि इतर मंडळी वकील साहेबांच्या
घरी चंदरच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करण्यासाठी आले.
वकीलसाहेबांच्या ऑफिसात सारीजण बसली, वकिलीनबाई बाहेर येऊन बसल्या, चंदरच्या यशाबद्दल कळताच त्यांच्या मनाला धक्काच बसला.
नंतर मात्र , “चंदरला सामान्य समजून त्याच्याकडून कामे करून घेतली ” याची त्यांना आता लाज वाटत होती.
वकील साहेबांनी सर्वांना पेढे दिले, चंदरचे अभिनंदन करून सारेजण निघून गेले.
बैठकीत वकीलसाहेब, चंदर आणि बाईसाहेब असे तिघे बसलेले होते.
बाईसाहेब म्हणाल्या –
“चंदर , कम्माल केलीस बरं तू , दिवसभर कोलेज आणि घरी आल्यावर आमची कामं, एवढं करून तू तुझा अभ्यास केव्हा केलास रे ?
नाही तर आमची पोरं ,नुसती चैन करायला पाहिजे , अभ्यास नाहीच.
चंदर , तू मात्र खरा विद्यार्थी शोभतोस. मध्माशांसारखी चिकाटी आहे तुझ्याजवळ. !
चंदरच्या यशाने वकिलीणबाईंना खरोखर आनंद झाला होता.
वकीलसाहेब म्हणाले –
हे बघा – यापुढे चंदरला आपल्या घरातील कोणतेही काम सांगायचे नाही. त्याच्या अभ्यासाकडे आता मी स्वतहा लक्ष देणार आहे .एक होतकरू
विद्यार्थी आपल्या घरात आहे ” , याची जाणीव आपल्याला उशिराच झाली .यापुढे मात्र असे होणार नाही. चंदरसाठी काही करण्यातच आपली
समाजसेवा होईल.
“बारावीचा निकाल लागल्यावर चंदर पहिल्यांदाच गावाकडे आलेला होता. “तो आला आहे ” , ही बातमी कळताच प्रत्येकजण त्याच्या घरी आलेला ,एकच गर्दी जमली.
चंदर सारखे यश या पंचक्रोशीत कुण्या विद्यार्थ्याला मिळाले नव्हते.
” गीरीजेचे शब्द खरे ठरत होते.-
ती नेहमी म्हणे- मजा चंदर म्हणजे ज्ञानेश्वर हाय , तुमी बघत रहा, लई शिकणार हाय चंदर .
गुरुजींना चंदरच्या या यशाने मोठा आनंद झाला . ते म्हणत होते- गावात राहून हा पोरगा वाया गेला असता, गुरे- ढोरे वळता वळता याचे आयुष्य बरबाद झाले असते . म्हणतात ना , की चांगल्या गोष्टी होण्यासाठी निमित्त लागत असते , त्याप्रमाणे ही पोरं माझ्या हाताला लागली . मी माझ्या कुवती प्रमाणे यांना घडवलं , आज माझ्या प्रयत्नांना चंदरच्या परिश्रमाने चांगले यश आलं.
Leave a Reply