कधी असेही घडावे,
सुखाला परिमाण नसावे,
भरभरून ओंजळीत त्यांस,
घेऊन छान मिरवावे,–!!!
कधी असेही घडावे,
आपुले सगळे आपुलेच राहावे,
परकेपणा सोडून देत,
जिवां-शिवांचे नाते जपावे,–!!!
कधी असेही घडावे,
सुंदरतेला सुगंध यावे,
त्यांना एकदा कडेखांदी,
दिमाखात घेऊन हिंडावे,–!!!
कधी असेही घडावे,
अपेक्षांचे ओझे नसावे,
मुक्त स्वैर आनंदाने,
खुशीचे विशाल पंख ल्यावे,–!!!
कधी असेही घडावे,
ताण-तणावांना निरोप द्यावे,
आपुल्या मस्त जीवनातून,
कायमचे त्यांना घालवावे,–!!!
कधी असेही घडावे,
सगळे विश्र्वच कुटुंब बनावे,
जिकडे जावे तिकडे केवळ,
प्रेममय वातावरण असावे,–!!!
कधी असेही घडावे,
मित्रत्त्वाला जिवापांड जपावे,
स्वार्थी, संकुचित वृत्ती
सोडून जिवांचे मैत्र करावे,–!!!
कधी असेही घडावे,
दु:खांना धरुन बडवावे,
क्षणार्धात संपवून त्यांना,
विजयी होऊन परतावे,!!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply