सध्याच्या फास्ट लाइफमध्ये बऱ्याच जणांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे, पण ह्याचे जर मूळ कारण शोधले तर बऱ्याचदा आपल्या चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या पद्धतीमुळे पोटाच्या समस्या ह्या जास्त प्रमाणात होतात. जर ह्यावर यशस्वीरीत्या मात कराची असेल तर प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. परंतु, म्हणून त्याचा अतिरेक करणे योग्य नाही. पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी दैनंदिन जीवनात करण्याच्या काही गोष्टी….
१. फायबर्स भरपूर प्रमाणात खा:
फळे, भाज्या यांसारख्या फायबरयुक्त अन्नपदार्थांचा आहारातील समावेश वाढवल्यास पोटातील हेल्दी बॅक्टरीयांचे प्रमाण देखील वाढेल आणि त्यामुळे तुमची भूकही कंट्रोल मध्ये राहील. तसेच चांगल्या फिटनेससाठी तज्ञांच्या मते दिवसभरात तुम्ही सुमारे ३० ग्रॅम फायबर्स घ्यायला हवेत.
२.धान्य खा: ( स्प्राऊट्स )
आहारात धान्यांचा समावेश केल्याने इम्म्युनिटी, मेटॅबॉलिझम आणि पोटातील चांगल्या बॅक्टरीयांचे प्रमाण सुधारते तसेच वजनही कंट्रोलमध्ये राहते कारण अशा पदार्थांच्या सेवनाने मुख्यत्वेकरून भूक आटोक्यात राहण्यास खूपच मदत होते आणि तुम्ही इतर फास्ट फूड खाण्यापासून दूरच राहता.
३.व्यायाम:
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे व्यायाम करायला वेळ न मिळणे हि बऱ्याच जणांची समस्या आहे पण जर तुम्हाला खरोखरच जर एक निरोगी आयुष्य जगायचं असेल तर व्यायाम हा केलाच पाहिजे आणि अगदीच नाही तर निदान रोज अर्धा तास सकाळी चालायला किंवा सायकल चालवायला गेलेच पाहिजे कारण व्यायामामुळे पोटाचे आरोग्य सुधारते. व्यायामामुळे घाम येतो आणि अधिक फायबर्स व कार्ब्स खाल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा कायम राहते. परिणामी पोटाचे आरोग्य सुधारते. तज्ञांच्या संशोधनानुसार आज जगात ७०% आजार हे पोटामुळे होत आहेत आणि ह्याचे मुख्य कारण आजची बदलती जीवनशैली हे आहे.
४. अँटिबायोटिक्स घेणे कमी करा:
बऱ्याचदा लोक हताश होऊन घरगुती उपाय करण्यापेक्षा पटकन आणि लवकर इफेक्ट देणाऱ्या अँटिबायोटिक्स कडे जास्त वळतात आणि ह्याचे प्रमाण हल्ली संशोधकांच्या सर्वेक्षणातून खूपच वाढताना दिसून आले आहे पण तुम्ही हे लक्षात घ्या की अशा अँटिबायोटिक्समुळे पोटातील चांगल्या आणि हानिकारक अशा दोन्ही प्रकारच्या बॅक्टरीयांवर परिणाम होतो. म्हणून अँटिबायोटिक्स टाळणे शक्य नसल्यास त्यासाठी डॉक्टरांना दुसरा सुरक्षित पर्याय विचारा.
— संकेत प्रसादे
Leave a Reply