आपण जर फायरफॉक्स ब्राऊजर वापरत असाल तर, मराठीतून शुद्धलेखन तपासण्यासाठी (Spell Checking) मराठी डिक्शनरी ९.१ ही एक उत्तम अॅड ऑन सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे.
भाषेतून काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे एक अत्यंत उपयुक्त असे अॅड ऑन आहे. यामुळे हा ब्राऊजर वापरून आपण जेव्हा मराठीतून लिखाण करतो, तेव्हा या डिक्शनरीला वाटणाऱ्या चुकाखाली लाल रंगाची नागमोडी रेषा दिसून येते, आणि त्या शब्दावर राईट क्लिक केले असता त्या शब्दाला पर्याय सुचविलेले दिसतात.
१. हे अॅड ऑन डाऊनलोड केल्यानंतर फायरफॉक्स रिस्टार्ट करावे.
खाली दिलेल्या लिंकवरून ही सुविधा डाऊनलोड करता येईल.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/marathi-dictionary/
— रमण कारंजकर
Leave a Reply