आपण जर एखादे जुने घर बघत असाल तर नक्कीच बघा, पण आपण घरासाठी कर्ज घेणार असाल तर प्रथम जुने खरेदी खत चालू घर मालकाकडे आहे का हे तपासून बघा अन्यथा बऱ्याच बॅंका या कारणामुळे कर्ज मंजूर करत नाहीत.
जर ते घर ८ ते १० लोक्कांनी खरेदी विक्री केलेली असेल तर सर्व खरेदी खताच्या सत्य प्रती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपल्याला नक्कीच हा त्रासाचा विषय आहे. कारण कोण घेतो त्या जुन्या प्रती आणि काय उपयोग आहे आपल्याला त्याचा. पण असो.
पण जेव्हा आपण घर खरेदी करतो आणि नवीन खरेदी खत करतो त्यावेळी सरकारी कर भरतो हि जबाबदारी सरकारी मंडळी अगदी जबाबदारीने पार पडतात अगदी १ रुपया सुद्धा सरकारी कर सोडत नाही. मग त्याचे काम नाही का जुने खरेदी खताची सत्यप्रत जमा करून घेण्याची. हि नसती उठाठेव मला का ?
एकतर मागील ८-१० खरेदीदार / विक्रीदार अडाणी असले तर त्यांना साधे लिहिता वाचता येत नसेल तर, एकतर घर खरेदी करतांना चांगला शिकलेला मनुष्य गांगरून जातो मग या अडाणी लोक्कांनी काय करायचे.
आणि एकतर बॅंका या खरेदी खतामुळे आपल्याला अडून बघतात. आणि बऱ्याच बॅंका आधीच प्रोसेस फी घेतात आणि नंतर सांगतात आपले चैन कागदात्रे नाहीत आणि जर आपण परत प्रोसेस फी मागायला गेलो तर कापून पैसे परत मिळतात.
खाया पिया कूच नाही आणि ……………………………………
— सचिन सदावर्ते
Leave a Reply