दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत
प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात…१,
सावध होवूनी प्रथम पावूली, टाळावे ते संकट
मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर, दिसत नाही वाट….२,
मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली
चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली…३,
जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटूनी जातो
मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो….४,
वेगवान त्या जीवन प्रवाही, खिळ बसे मोहाने
क्षणीक सुखाच्या मागे जातां, दु:खी होई जीवने….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply