प्रस्तावना
आज २८ मे ….. !!!
स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकरांचा जन्मदिवस !!
आजपासून मी सावरकरांच्या चरित्रावर लिहिण्याचे ठरवले आहे. सावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करतात त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले.
खरच सावरकर घाबरले होते कां ? त्यांना इंग्रजांनी काय प्रस्ताव दिला होता .त्या प्रस्तावावर त्यांनी कशा प्रकारे विचारपूर्वक उत्तर दिले.त्या प्रसंगी काय कारणे होती हे तपासून पाहणे अत्यंत जरुरीचे आहे.खरेतर छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा आणि सावरकरांच्या वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
लोकमान्य टिळक, आगरकर,गोपालकृष्ण गोखले ,महात्मा गांधी ,बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले ,शाहू महाराज ,कर्मवीर भाऊराव पाटील ,महर्षी कर्वे ,विनोबा भावे ,प्रबोधनकार ठाकरे ,अगदी अलीकडचे कॉम्रेड डांगे, बाळासाहेब ठाकरे आचार्य अत्रे यांच्यावर टीका करताना दहा हजार वेळा विचार केला पाहिजे.या उत्तुंग उंचीच्या लोकांची चरित्रे कुठलाही सामाजिक आणि राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून वाचली पाहिजे.त्यांनी निर्माण केलेले साहित्य अभ्यासले पाहिजे .
या सर्व महापुरुषांनी त्यांची स्वतःची अशी एक स्वतंत्र विचार निर्मिती केलेली आहे .तसेच त्यांचा अपरमित त्याग आहे. समाजाबद्दल त्यांना कळवळा आहे .
त्यामुळे एखाद्याची तळी उचलताना दुसऱ्यावर अन्याय करून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा कुठल्याही सामान्य माणसाला अधिकार नाही.
(क्रमशः)
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply