१९ फेब्रुवारी २००८ रोजी पार्लमधिल बोलंड बँक पार्कवर श्रिलंका वि. कॅनडा हा २००३ च्या विश्वचषकातिल अठरावा सामना खेळला गेला. श्रिलंकेने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅरी सिबारन या कॅनडाच्या गोलंदाजासाठी हा पदार्पणाचा सामना होता.
९००१०९०६६० हा खास मागुन घेतलेला भ्रमणध्वनी क्रमांक नाही. ह्या आहेत कॅनडाच्या पहिल्या दहा फलंदाजांनी या सामन्यात केलेल्या धावा. सिबारन – अकरावा फलंदाज – चेंडू न खेळताच नाबाद राहिला. अवांतर धावा पाच. कॅनडा ६ बाद १२ वरून १८.४ षटकांमध्ये सर्वबाद छत्तीस. मुथय्या मुरलिदरन, दिल्हारा फर्नांडो, चमिंडा वास आणी प्रबाथ निसांका यांना अनुक्रमे १, २, ३ आणी ४ बळी.
महदाश्चर्य म्हणजे ही धावसंख्या गाठताना श्रिलंकेचा एक विर डावातिर्थी पडला. अठरा मिनिटांमध्ये (आणि अठ्ठाविस चेंडुंमध्ये) १ बाद ३७ धावा काढुन श्रिलंकेने हा सामना खिशाच्या कोपर्यात घातला. मर्वन अटापट्टू नाबाद २४, कुमार संगकारा नाबाद ४.
या सामन्यात तोवरच्या एदिसांमधिल निचांकी धावसंख्येचा विक्रम मोडला गेला (कॅनडाकडुन की श्रिलंकेकडुन हे ज्याचे त्याने ठरवावे !). योगायोग म्हणजे याआधिही श्रिलंकेनेच ३८ धावांवर झिम्बाब्वेला सर्वबाद केले होते. सिंहलिज् स्पोर्ट्स क्लब, कोलम्बो डिसेम्बर २००१.
श्रिलंकेत जन्मलेला संजयन थुराइसिंगमसाठी हा सामना आठवणित ठेवण्यासारखा झाला. कॅनडाकडुन खेळताना त्याने सनथ जयसुरियाला अवघ्या नऊ धावांवर बाद केलेले होते !
सामन्यानंतर जो हॅरिस या कॅनडाच्या कर्णधाराने कॅनडाचा संघ दबाव सहन करू शकला नाही असे विधान केले. काय दबाव ? कुणिही फलंदाज दहाच्या भोज्याला शिवू शकला नाही. दोन तासांच्या आत सामना खतम् ! विश्वचषकाच्या इतिहासातिल हा सर्वात कमी काळात सम्पलेला सामना होता. जखमी गुणरत्नेच्या जागी खेळणार्या प्रबाथ निसांकाने १२ धावांमध्ये ४ बळी घेत कारकिर्दितिल सर्वोत्तम कामगिरी केली आणी सामनाविर पुरस्कार मटकावला.
<एदिसांमधिल न्युनतम सांघिक धावानिकष : पन्नासहुन कमी धावा
- ३५ -झिम्बाब्वे श्रिलंकेविरुद्ध. हरारे. २००४
- ३६ – कॅनडा श्रिलंकेविरुद्ध. पार्ल २००४.
- ३८ – झिम्बावे श्रिलंकेविरुद्ध. कोलम्बो. २००१
- ४३ – पाकिस्तान. वेस्ट इंडिजविरुद्ध. केप टाउन १९९३.
- ४४ – झिम्बाब्वे बांग्लादेशाविरुद्ध. चितगांव २००९.
- ४५ – कॅनडा इंग्लंडविरुद्ध. मँचेस्टर १९७९
- ४५ – नामिबिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध. पॉश्चफस्ट्रुम २००३.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply