मम चित्ती तुझे रूप गोपाळा, यशोदानंदन जगत्पालका,
जगदाधिशा प्रतिपाळा,
आठवती किती नावे कृष्णा,—
देवकीनंदना वसुदेवसुता,
राधेच्या कृष्णा, रुक्मिणी- भ्रतारा,
तुझं आठवते मी घननिळा, द्वारकाधीशा,
विष्णू अवतारा मनमोहना तू बाळकृष्णा,–!!!
गोपिकांमधील तू श्रीरंगा,
श्रीहरी तू जगदोद्धारा,
नटवर तू अनादि अनंता,
उभा राहशी प्रसंगी सारथ्या,–!!!
कधी भासशी नुसती कल्पना,
पण विहरशी आत्मी मनोहरा, सत्यभामा तुझीच कांता,
लुब्ध तिच्यावर तू मुरलिधरा,—!!!
सुभद्रावर, तू तिच्यावरी भाळता, सुभद्राहरण करशी नंदकिशोरा,
काय म्हणू तुझ्या स्वरूपा,
असशी, भासशी अनेक रुपा,
वात्सल्यमूर्त तू हे नंदबाळा,
स्मरते मी तुज कितीदा गिरिधरा,–!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply