स्पर्शाने बघ तुझ्या पडतो,
रिमझिम रिमझिम सडां,–
मनात बहर खूप फुलतो,
त्यावरती रोमांच खडा,–!!!
जवळ तू अगदी येता,
मनमोगरा उमलतो,
तन-मन गंधित होता,
प्रणय- सडा पडतो,–!!!
कवेत तुझ्या शिरता,
प्रेमधून कोण वाजवतो,
त्यात भान हरपतां,
दुनियेचा रंग बदलतो,–!!!
कानात बोल मधुर घुमता,
वाटे प्रीतशब्द बोलतो,
शेवटी निवडून धरा,
मदनच खाली उतरतो,–!!!
कोमलांगी तू चारुलता,
मनात मी गांगरतो,
आवेगाचे तीर साऱ्या,
अंगोपांगी झेलतो,–!!!
मर्द पुरुष मी रांगडा,
तुझ्या बाहुत विसावतो,
धुंद आपुल्या प्रणया,
शृंगाराचा साज असतो,–!!!
जोडीला रती-मदनाच्या,
अंधार सामील होतो,
विसर पडे विश्वाचा,
पहाटेचा प्रहर उगवतो,–!!!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply