तू किती पारदर्शी,
दाखवशी आरपार,
तुझ्यापासून कोण लपवी,
आपुले रे निखळ अंतर, –!!!
माणसा, तू कसा असशी
बघ एकदा निरखून,
काय चालले तुझ्या चित्ती,
भावनांचेच चढ-उतार, –!!!
वरून पाहता प्रतिमा देखणी, लक्षपूर्वक पहा वरील रूप,
आत खळाळत्या खोल समुद्री, मनाची डचमळे कशी लाव,
रूप, रंग, गंध ,स्पर्शी,
कुठलेही नसे संवेदन,
संवाद साधावा आरशाशी,
राहून स्थिर अगदी निश्चल,–!!!
स्वतःकडे पहा माणूस म्हणुनी स्थान आपुले आहे काय,
मग ठरवावे विचारांती,
महत्त्व तेही, नक्की काय–!!!
तू खरे चित्र दाखवी,
मनुजा करीत आवाहन,
रूप त्याचे फक्त वरपांगी,
रंग खरे आत विलक्षण,
जीव अस्वस्थ तुझ्या भेटी,
आत कुठे चाले खळबळ,
काय लपवले मी हृदयी,
विचार करतो असा निव्वळ,–!!!
आरशां, तू खरा मुनी,
शांत स्थिर स्थितप्रज्ञ,
माणूस असता विमोचनी,
तारक नसतो कुणी अन्य,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply