गणपतीबाप्पाबद्दल कुतुहल आणि त्यातून येणार्या बर्याच अनुत्तरीत प्रश्नांची उकल करणारे हे नवे सदर….
मोरया माझा – ३ :
असा प्रश्न विचारला तर लोक पटकन सांगतील, अहो त्यात काय एवढे कठीण? मोरयाचा एकदा तुटलेला असतो म्हणून त्यांना एकदंत म्हणतात.
पण हे बरोबर आहे का? इतका वरपांगी अर्थ त्यात असेल का? जर वर्णन केल्याप्रमाणे मोरयाचा एक दात तुटला, अर्धा आहे तर मग त्याला दीडदंत म्हणायला नको का? एकदंत कसा?
याचा अर्थ तेथे केवळ मराठी व्याकरणाने अर्थ लावून उपयोग नाही. मग एकदंत चा अर्थ काय?
शास्त्रात एक हा शब्द मायेसाठी वापरल्या जातो. तर दंत त्या शब्दाचा संबंध सत्तेशी, शक्तीशी आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? तर लक्षात घ्या ज्यावेळी आपल्याला ताकद लावून हे एखादी गोष्ट करायची असते त्यावेळी आपण आपोआप दात आवळतो. अर्थात दात म्हणजे सत्ता,शक्ती.
एक असणाऱ्या मायेवर ज्याची एकट्याचीच सत्ता चालते त्या परमात्म्याला एकदंत असे म्हणतात.
आता याच्याशी संबंधित आणखी एक प्रश्न. मोरयाचा एकदा तुटला आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण कोणता? डावा की उजवा?
शास्त्राने त्याचे स्पष्ट शब्दात उत्तर दिले की डावाच. कां? तर ज्याच्या जवळ आल्यानंतर डाव्या अर्थात् गौण, क्षुद्र,नीच शक्ती तुटून पडतात त्या शुद्ध परब्रह्माला श्री एकदंत असे म्हणतात.
— विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply