बिल्डिंगमध्ये शेजारी एक बाळ जन्माला आलं.
महिना, दोन महिने, सहा महिने उलटले तरीही
त्या कुटुंबात बाळाचं नांव काय ठेवायचं हे ठरेचना.
त्या बाळाला मुन्ना, सोनू, पिल्लू, चिकू अशा
तोंडाला येईल त्या नांवाने त्याचे आई-बाबा,
मोठा दादा, आजी- आजोबा,
काका-काकू बोलायला लागले.
ठरलेल्या नांवावर एकमत होईना.
निर्णय लांबणीवर.
आम्हांला जाता-येता त्या दारावरूनच जावं लागतं.
आम्हीपण त्या बाळाशी बोलतोच.
मंग तुम्हाला त म्हायते माव सोभाव कसाय ते !
शेवटी मीच त्याचं नांव ठेवलं ….
टुट्टू !
मग समोरून जाता-येता मी त्याला
ए टुट्टू ! ओये टुट्टू !
काय टुट्टू ! काय चाललंय !
टुट्टू झालं का मम्मम् टुट्टू ?
टुट्टू, झाली का बुडबुड टुट्टू ?
असं बोलायला सुरुवात केली.
सतत “टुट्टू – टुट्टू” हीच हॅमरिंग.
अखंडपणे पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांची मालिका
कठोर काळा कातळही खोदून काढू शकते.
कालांतराने “टुट्टू” शब्द ऐकताच
ते बाळही मला छान प्रतिसाद देऊ लागलं.
मग ही आणि आमचा शाश्वतही
त्याच्याशी तसंच बोलू लागले, टुट्टू !
तेच अजूनही सुरू आहे. पण …
शेवटी हाँ-हूँ करता-करता
बाळाच्या पहिल्या वाढदिवशी
मोठ्या थाटात त्याचं बारसं झालं
‘मयंक’ नामकरण झालं.
परंतू पुढे काय होणार आहे याची
त्या कुटुंबाला अजिबात कल्पना नव्हती.
आमचं आपलं तेच…
ए टुट्टू ! ओये टुट्टू !
आज ते गोड बाळ सुमारे दीड वर्षाचं झालंय
आणि आज…
त्या कुटुंबातील सर्व सदस्य त्याला आता
‘टुट्टू’ या नांवानेच बोलतात.
— हमकरेसोकायदावंत
“आम्ही साहित्यिक” या फेसबुक ग्रुपवरील लेखकांचे निवडक साहित्य येथे प्रकाशित केले जाते.
Leave a Reply