गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे ।
जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे ।।
निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा ।
झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या ।।
दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं ।
आज दुवा नसता सारे पडती पाठी ।।
तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे ।
वंशाने जे मिळे त्याला, जीवन झगडा देणारे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply