अपमान होईल तुझा शारदे हे घे तू जाणूनी
मूर्खावरती बरसत आहेस जाणेना कुणी….१
ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा असे माझे ठायी
भाषा साहित्य यांच्या छटा दिसून येत नाही….२
निर्धनासी धन मिळता जायी हर्षूनी
हपापलेला स्वभाव येई मग तो उफाळूनी….३
माकडाचे हाती मिळे कोलीत विनाशास कारण
गैरउपयोग होई शक्तीचा नसता सामान्य ज्ञान…४
शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता
वेड्यापरी कोठेही पळतील मर्यादा सोडता…..५
जाण आहे एकची मजला तुझ्या शक्तीची
वाल्मिकी कालीदास, अज्ञानीना ज्ञानी केल्याची….६
तसेच देवून ज्ञान मज थोडेसे शाहणा कर आधी
ठेवणार नाहीत नावे मजला नंतर कुणी कधी….७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply