नवीन लेखन...

धोबी घाट`- बाहेरच्यांची मुंबई

नेटवर फिरताना अनेक चांगले ब्लॉग्ज दिसतात. यातील काही ब्लॉग्जमधील निवडक मजकूर त्या त्या ब्लॉगच्या मालकाच्या / सूत्रधाराच्या नामनिर्देशाबरोबर मराठीसृष्टीवर उपलब्ध करुन देण्यात येतो. या लेखाला त्या त्या ब्लॉगवरील मूळ लेखाशी लिंकद्वारे जोडले जाते. या अशाच उपयोगी ब्लॉगमधील एक सिनेमा परिचय-परिक्षण. गणेश मतकरी यांचा

हा ब्लॉग…..


`धोबी घाट`बद्दल त्याच्या प्रदर्शनापासून एक संभ्रमाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं. खरं तर तसं असण्याला कारण नाही. हा चित्रपट वेगळा आहे, असणार, हे आपल्याला अपेक्षित तर होतंच. त्याच्या पूर्वप्रसिद्धीपासून ते `धोबी घाट` या वरकरणी चमत्कारिक नावापर्यंत सर्वच बाबतीत त्याचा हा वेगळेपणा अधोरेखित कऱण्यात येत होता. त्यामुळे आता प्रदर्शनानंतर तोच वेगळेपणा ही बातमी होऊ शकत नाही. त्यातून तो वेगळा आहे म्हणजे काय? तो अगम्य आहे, कळायला कठीण आहे का ? तर अजिबात नाही.

तर धोबी घाट वेगळा कसा, तर तो आपल्या चित्रपटांच्या कोणत्याच संकेतांना जुमानत नाही. गाणी टाळणं किंवा मध्यांतर न घेणं, हे तसं त्यामानाने वरवरचे बदल आहेत, आणि हल्ली आपले बरेच चित्रपट बाहेरदेशीच्या महोत्सवात हजेरी लावत असल्याने ते रूढ होणं हे स्वाभाविक आहे. अर्थात इंग्रजी चित्रपटांना नसणारी मध्यान्तरं घेणा-या आपल्या चित्रप्रदर्शन संस्कृतीमध्ये मध्यान्तर गाळून दाखविण्याचा धीटपणा हा धोबीघाटला असणा-या स्टार सपोर्टमुळेच येऊ शकतो, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तर या प्रकारचे कलात्मक चित्रपटांशी नातं सांगणारे बदल इथे जरूर आहेत,पण त्याहून अधिक मूलभूत स्वरूपाचे बदलही आहेत.

एकेकाळी गाजलेले पण पुढे बदलत्या काळाबरोबर हद्दपार झालेले सिनेमे आज मल्टीप्लेक्स कल्चरमधून पुन्हा डोकं वर काढताना दिसताहेत. धोबी घाट हे त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे. तो परिपूर्ण नक्कीच नाही, पण त्याला असलेलं स्थलकालाचं भान हे त्याचं नाव लक्षात राहायला पुरेसं आहे. अन् आजवर कलाबाह्य कारणांसाठी चर्चेत असलेल्या `किरण राव` या त्याच्या दिग्दर्शिकेचंही!

– गणेश मतकरी.

मूळ ब्लॉगवरील विस्तृत परिचय वाचा….

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..