भारत आणि पाकिस्तानदरम्यान विश्वचषक क्रिकेटचा उपान्त्यफेरीतील सामना बुधवारी मोहालीत रंगणार आहे. सगळ्या भारतवासीयांचं आणि अनिवासी भारतीयांचंही त्या सामन्याकडे लक्ष लागून राहिलंय.
पाकिस्तानी कर्णधाराने आणि काही खेळाडुंनीही दर्पोक्ति केलेय की आम्ही जिंकणारच.. भारताला लोळवणारच…सचिनचे महाशतक होऊन देणारच नाही….वगैरे वगैरे. आता अशीच दर्पोक्ती कांगारुंच्या कर्णधारानेपण केली होती आणि कांगारू कसे जायबंदी होउन घरच्या वाटेला लागले ते सगळ्यांनीच बघितलंय त्यामुळे पाकींच्या दर्पोक्तिला किती महत्त्व द्यायचं ते आपल्या सगळ्यांनाच नीट ठाउक आहे.
भारत-पाकिस्तान या दोन संघांत होणारा सामना हा दोन्ही देशांसाठी जणू धर्मयुद्धच असते. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून भारत-पाकिस्तानातील बिघडलेले संबंध सुधारण्याची संधी म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांना थेट पत्र पाठवून या सामन्याचे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधानांच्या या भूमिकेने अनेकांच्या भूवया उंचावल्या. काहींना तर पंतप्रधानांच्या भूमिकेमुळे भारतीयंचा अपमान झालाय असंही वाटलं. नेटवरील वेबसाईटस, ब्लॉग्ज, ट्विटर वगैरेवर तर प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. आम्हीच नंबर वन म्हणणार्या काही वृत्तपत्रांनी आणि चॅनेल्सनी आमच्याकडे काय तुफान प्रतिक्रिया आल्या आणि किती फोन आले म्हणून सांगू… असा प्रचारच सुरु केला.
मूळ मुद्दा असा आहे की अशा प्रकारच्या क्रिकेट मुत्सद्देगिरीमुळे या दोन देशांतले संबंध सुधारणार आहेत का? इतिहास काय सांगतो? भारताने पाकिस्तानला सुधारण्याच्या आणि मतपरिवर्तनाच्या काही कमी संधी दिल्याहेत? मात्र त्यातून पाकिस्तानने काही सुधारणा केलेय का? अगदी अटलजींनी मुशर्रफना बोलावले तेव्हाही असेच झाले. यांची शेपुटच वाकडी त्याला आपण तरी काय करणार?
बरं एवढं होऊनसुद्धा सुधारतील आणि हा नाद सोडतील तर ते भारतीय नेते कसले? आमच्या स्वत:च्या नागरिकांवर आपल्याच काश्मिरमध्ये अन्याय झाला तरी काही हरकत नाही पण मुंबई-पुण्यात एकाद्या पाकी किंवा
बांगलादेशीवर कारवाई झाली, झोपडप़ट्टी तोडली की यांना पुळका येतो मानवतेचा आणि मानवी हक्कांचा. पाकिस्तानने कितीही कुरापती काढव्यात….आपल्याकडे मात्र त्यांना मानाने बोलवा.. पाहूणचार करा.. बिर्याणी खायला घाला.. सगळं त्यांच्या मनासारखं करा. कसाब येउ दे नाहीतर आणखी कोणी. आमचे सख्खे शेजारी आहेत हो ते.
सचिनबद्दल या माजरट संघाच्या मुजोर नायकानं केलेलं वक्तव्य तर भारतीयांच्या भावना दुखावणारंच आहे. आपली लायकी काय.. आपण बोलतोय किती हे तरी बघायचं? तरी बरं सचिनने त्यांच्या सगळ्याच गोलंदाजांची नेहमीच धुलाई केलेली आहे. मॅच फिक्सिंगमध्ये एक्सपर्ट असलेल्यांनी क्रिकेटमधल्या जंटलमनला काही न बोललेलंच बरं.
या क्रिकेट सामन्याच्या निमित्तानं एकमात्र बरं झालंय. भारताने पाकिस्तानला धूळ चारलेली बघायला पाकिस्तानचे हे दोघे मान्यवर येणार असतील तर चांगलंच आहे. किमान त्यांच्या संघाची लायकी काय हे तरी बघतील. बिर्याणी खाउन माजलेल्या त्या संघातल्या खेळाडूंची मस्ती त्यांच्याच लोकांसमोर उतरलेली बरी ना? आणखी एक गोष्ट चांगली आहे. मोहाली पाकिस्तानच्या सीमेपासून तसं जवळंच आहे. तेव्हा पाकी हरल्यावर चालत चालतसुद्धा आपल्या देशात जाउ शकतील आणि त्यांचं नेतृत्त्व करतील त्यांचेच राजकीय नेते. काय मस्त सीन असेल तो? अगदी “लक्स क्या सीन है” च्या तोडीचा!
माननीय पंतप्रधानांना एक विनंती. आता यांना बोलावलंयच तर आणखीही काही मान्यवर पाहुणे बोलवा. लादेन, मुशर्रफ, दाऊद, यांना तर बोलवाच. पण अफझल गुरु आणि कसाबलाही थोडं मोकळं होऊन द्या. त्यांनाही मोहालीचं निमंत्रण पाठवा आणि खास कॉर्पोरेट बॉक्समध्ये बसवून क्रिकेटचा आनंद घेउन द्या. अंडा सेलमध्ये नाहीतरी कंटाळलेलेच असतील बिचारे. तेवढाच थोडा विरंगुळा त्यांना. बरं या कॉर्पोरेट बॉक्समध्ये खास रंगीत पेयपानाचीही व्यवस्था करुन ठेवा आणि काजू बदाम पिस्ते पण ठेवा हं. पाणीही बिसलंरीचंच द्या त्यांना.
ठिक आहे तर मग. मोहाली ते लाहोर पदयात्रेसाठी पाकिस्तानी संघाला हार्दिक शुभेच्छा. रस्त्यात पाण्याची पिंपं भरुन ठेवलेलीच आहेत. बिसलरी मात्र आम्ही फक्त कसाब आणि अफजललाच देणार!!!!
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply