थांब थांब थांब आई थांब ना ग थोडे नको दामटूस समजुन मला रेसचे घोडे आत्ता कुटे संपली शाळा लागली मला सुट्टी लगेच नको लाउस कुट्ला क्लास माझ्यापाठी मांडीवर तुझ्या लोळु दे ग थोडे म्हणु देत कुणी मला म्हणतील वेडे थांब थांब थांब आई ना ग थोडे थांब ना ग थोडे सूर्य कसा उगवतो माहितय का तुला कळी कशी उमलते बघु दे ग मला समजुन घेईन मी पाखरांच्या बोला का ग किलबिलती पडले हे कोडे थांब थांब थांब आई ना ग थोडे थांब ना ग थोडे गच्चीवरती झोपुन पाहू दे आकाश चांदोमामा देतो कसा शीतल प्रकाश झोपती का गाईगुरे जागती का तारे अंधारात दिसती कशी हिरवी हिरवी झाडे थांब थांब थांब आई ना ग थोडे थांब ना ग थोडे
<>
— प्रभा मुळे
Leave a Reply