देव देव राहतो कुठे ?
सांग आई, सांग आई !
चंद्रावरती, सूर्यावरती
आभाळी की धरेवरती?
सागरात , पर्वतशिखरी
जंगलात की पाण्यामध्ये
दगडगोट्यात,धातूमध्ये
देवळात की मठामध्ये?
शाळामध्ये, घरामध्ये
रानीवनी की मुर्तीमध्ये
मंत्रतंत्र की ग्रंथामध्ये
महाली की कोपीमध्ये ?
तुझी वात माझ्यामध्ये
माझा दीप तुझ्यामध्ये
दिसला गं देव माझा
आई, मला तुझ्यामध्ये
देव देव राहतो कुठे?
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५
Leave a Reply