माझा भाबडेपणा माझ्या सख्या शिक्षकांनीही कधी गांभिर्यानी घेतला नाही. ” कोणाला काही शंका असल्यास आवश्य विचारा ” एवढे फक्त म्हणायचे आणि शंका विचारण्यासाठी मी कधीही हात वर केला की एखाद्या संशयित आरोपीसारख माझ्याकडे बघायचे.
येजदी मोटरसायकलच्या पेट्रोल टँक सारख लांबटगोल आणि मधे खोलगट डोक असलेल्या म्युझिक टीचरना मी एक रास्त शंका म्हणुन आदबीनी विचारल की सर ” घसा बसला असताना आपण बासरी वाजवली तर बासरी व्यवस्थित वाजते का? का तीही तशीच वाजते? ” तर काही कारण नसताना मला डस्टर फेकुन मारल.
” होनहार बिरवानके होत चिकने पात ” या मुहाव-याचा बरेच दिवस अर्थ कळत नव्हता (अजुनही कळलेला नाही) म्हणुन हिंदीच्या सरांना अर्थ विचारायला गेलो तर म्हणाले शाळा सुटल्यावर एकटा भेट!
भूगोल आणि इंग्रजीच्या सरांनाही मधल्या सुट्टीत एकत्रित गाठुन विचारायला गेलो की हाय वे तर लांब असतो त्याला लॉंग वे न म्हणता हाय वे का म्हणायच? तो काय उंचावर असतो का? काही उत्तर न देता दोघेही विरुध्व दिशांना निघुन गेले.
व्यवस्थित फी भरुनही शिक्षण अर्धवट राह्यल्याचा फील येत असतो मला मधे मधे.
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply