मुक्तछंद
उगवतिचा सुर्य
मज वाटतो एक गेंद
टोलवावा उंच नभात
हीच प्रबळ मनिषा मनात
सागर किनारी
प्रभातवेळी उगवतो हा पुर्वेला
भल्या भल्यांना मोहवितो
खट्याळ आहे जरा
चित्रकार येती जाती
असंख्य चित्र रेखाटती;
मधेच येई छाया चित्रकारही
छबी खेचतो हजारदा
प्रेमी युगले इथेच येती
गुज मनीचे सांगण्यास
प्रेमाच्या आणा भाका देती
तुझ्याच साक्षीने दिनकरा
साधूसंतही कितीक येती
येती ज्येष्ठ फिरावया
मला बाकी एकच ठावे
तुझ्यासवे मिळावे खेळावया
ही बघ वेगे वाळूतली पावले
सरकती माझी पुढे पुढे
ताकद माझी तुला दावतो
चल भिरकावणार तुला
उंच उंच आणिक उंच
अस्तित्व तुझे नगण्य वाटे
बळ माझे वाढले
दिवस व्हावा म्हणुन तुला
आज माफ मीच केले….
करू नकोस गमजा वृथा
मी साहसी वीर बालक
नाही नमणार कुणापुढे
कुणापुढे
सौ.माणिक (रुबी)
Leave a Reply