दिसभर उकाडा हा
कुणासही सोसवेना
त्यावर फुंखर म्हणून का
केशरी चंद्राच्या दुधाळ चांदण्यांची शितलता…
आश्विन पोर्णिमेसी वाढली निरभ्रता,सवे पिठूर चांदण्यांची मोहीनी मनाला….
अंबाबाईचा उत्सव जोडीला भुलाबाईचा जागर
शिव-पार्वतिचा संगम…
झाला दिवस लहान,आता होई रात्र महान
त्या रात्रीला ओवाळण्यास
दिपावली आली सत्वर…
शरदाचे हे दिवस सुगीचे
शेतकरी राजा
सुखी शय्येवरी आरामात निजे….
सौ.माणिक
(रुबी)
Leave a Reply