तुम्ही चंदना प्रमाणे अपार झिजला बाबा
केले तुम्ही सुगंधीत अमुचे शिवार बाबा।।धृ।।
रामजी-भिमाबाई ,माता -पिता आपुले होते।।
पत्नी रमाई,सवीता
यशवंत पुत्र होते।।
भिवा,भीमा,भीम आपले टोपण नावे बाबा।।
केले तुम्ही सुगंधित अमुचे शिवार बाबा ।।१।।
लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स ,
कोलंबिया।।
विद्यापिठातून अर्थशास्त्रात डॉ.मिळवल्या।।
अनेक पदव्या घेऊन शिक्षित झाले बाबा।।
केले तुम्ही सुगंधीत आमुचे शिवार बाबा ।।२।।
एकोणवीसशे छप्पन्नात बौद्ध धर्म घेतला।।
पत्रकारीतेस आपण सारा जन्म वाहीला।।
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला।।
केले तुम्ही सुगंधित आमुचे शिवार बाबा ।।३।।
महानिर्वाण दिनी पडते मी तुमच्या पाया।।
आपुल्या सम दुजा न होणे कोणी जगी राया।।
न्यायास विद्रोही पंढरपूर स्थापिती बाबा ।।
केले तुम्ही सुगंधीत अमुचे शिवार बाबा ।।४।।
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply