दिनरात कष्ट करी
शेतामधे राबतो मी
धनधान्य पिकवितो
तुम्हा सर्वा पोसतो मी
।।१।।
लोक म्हणती पोशिंदा
उभ्या जगाला तारतो
कष्ट दैवत बळीचे
भार नित्य उचलतो
।।२।।
खांद्यावरी लाकडाची
मोळी माझी सखी झाली
विकुनिया चार पैसे
मिळताच सुखं आली
।।३।।
घर्म धारा गळतात
गालफडं बसतात
डाव सारे फसतात
कर्ज फार असतात
।।४।।
नाही खंत मला त्याची
फेडणार सर्व राशी
नक्की सुदीन येणार
मनोमनी सदा खुशी
।।५।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply