विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते,
भासे तीही एकटी,
चमकण्यात कमी जाणवते,–!!!
चेहरा तिचा उतरुनी,
निस्तेज ती दिसते,
का बुडाली कुणाच्या विरही,
कोडे मजला वाटते,–!!!
असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले,
चंद्र दिसे ना कुठे जवळी,
रजत किरणांचे लेऊन शेले,–!!!
समूहातून दूरच उभी,
अंतरी कोलाहल उठलेले,
लांबूनही ती दिसते “दुःखी*,
पाणी डोळां साठलेले,–!!!
वाट बघे सुधाकरांची,
जीव पहा कसा लावते,
तळमळत आत आत सारखी, सख्याची कल्पना करते,–!!!
मिलन दूर,- दर्शन नाही, अधिकाधिक उदास वाटते,
वाट पाहत साजणाची, चमचमण्याचा देखावा करते,–!!
गायब माझा राजा कुठे,
विचार करते अंतर्यामी ,
स्थानाहून ना ढळणे,
धोरण तिचे मनोमनी,–!!!
इथे धरणीवरती मी,
राजसा, तुझी वाट पाहते,
कढ पचवत विरहाचे, जिवाशिवांचीच ओढ लावते,–!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply