तू खरी, का मी, प्रश्नच मज पडे,
कोण सुंदर जास्ती,
कोडेच ते पडे,–?
चिंतन करते, डोळे मिटुनी,
का तसेच करते तीही,–?
इतके साम्य दोघीतही,
तरंग उठतात प्रत्यही,–!!
काय निनादले अंतरंगी,
जणू पावा वाजवे श्रीहरी,
मंजूळ ती *धून ऐकुनी,
तीही गेली भान विसरुनी,-!
अद्वैतरुपे दोघीआम्ही ,
आत्मा एकच विचरी,
संवाद साधत प्रतिबिंबी,
म्हणू का माझीच सावली,-?
कृष्णच खेळतो लोचनी,
एकरुप झालो परमात्मी,
दुनिया कोण कुठली,
जाणत नाही आम्ही,
आमची असे वेगळी,
तल्लीन ती श्रीरंगी,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply