नवीन लेखन...

जनकल्याण समिती, अलिबाग, रायगड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती गेले १२ वर्षे अविरतपणे आदिवासींच्या जीवनात सौख्याचे व आशेचे रंग उधळण्यासाठी झटत आहे व आज इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर व साधनेनंतर या समितीने रायगड जिल्हयात २५० सशक्त आरोग्य रक्षकांची भक्कम फळी उभी केली आहे. हे आरोग्य रक्षक अगदी दुरवरच्या आदिवासी पाडयांमध्ये

जातात, भाषेचा अडथळा असून सुध्दा तिथल्या कुटूंबांशी संपर्क साधतात, त्यांच्या अडचणी, समस्या, वेदना, दुःख व त्यांच्या जीवनाचे जळजळीत वास्तव समजावून घेतात, त्यांना आरोग्य विषयक व वैयक्तिक शारिरीक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतात. यांतील प्रत्येक आरोग्य रक्षकाकडे एक पेटी सोपवलेली असते, ज्याच्यात प्राथमिक रोगांवरच्या गोळया, औषधे, मलमे, बँडेज इ. साधनांचा भरणा असतो, आजारी तसेच जखमी आदिवासींच्या घावांवर किंवा आजारांवर त्वरित उपचार व मलमपट्टी केली जाते, आजार गंभीर स्वरुपाचा असेल तर त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते, त्यांच्या उपचारांचा सारा खर्च अर्थात समितीच उचलते. पनवेलला या समितीचे अत्याधुनिक व अद्ययावत रुग्णालय आहे जे कमीत कमी शुल्क आकारुन सर्वांच्याच उपचारांसाठी खुले आहे. या समितीचे फिरते रुग्णालयसुध्दा आहे, जे अगदी कानाकोपर्‍यांमधील पाडे शोधून तिथे जाऊन तिथल्या आदिवासींना विविध सेवा पुरवते.

ही समिती गरिब मुलांना शिक्षणाबाबत अतिशय दक्ष आहे. काही घरांत शाळेविषयी व अभ्यासाविषयी ओढ असलेले अनेक विद्यार्थी असतात, ज्यांना केवळ घरच्या परिस्थितीमुळे किंवा अपुर्‍या जागेमुळे नियीमत अभ्यास करता येत नाही व याचा त्यांच्या शैक्षणिक विकासावर वाईट परिणाम होतो. अनेकदा आजूबाजूच्या गजबजाटामुळे, सततच्या भारनियमनामुळे किंवा प्रदुषणामुळेसुध्दा अनेक विद्यार्थी कष्टाळु व होतकरु असुनसुध्दा शालेय परिक्षांमध्ये, केवळ अपुर्‍या तयारीमुळे मागे पडतात. अशांसाठी समितीने पनवेल कोळीवाडयामध्ये मोठी अभ्यासीका बांधली आहे, जिच्यात अनेक विद्यार्थी शांतपणे आपापला अभ्यास करतात, व सवयंसेवकांच्या देखरेखीखाली त्यांना कुठल्याही अडथळयांविना एकाग्रचित्ताने पाठयपुस्तके वाचता येतातण् ही समिती वर्षभर आपल्या हितचिंतकांकडून व देणगीदारांकडून वनवासी विकास निधी गोळा करते व दिवाळीच्या सुमारास या पैशांमधून आदिवासी पाडयांमध्ये जाऊन तेथील महिलांना नवीन साडी चोळी देते, मुलांना कपडे देते तसेच सर्वांना खाऊ व फराळाचे वाटपसुध्दा केले जाते.

रायगड जिल्हयात या समितीमार्फत मोठया प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. ज्याअंतर्गत अनेक आदिवासी घरांमध्ये गणपतींच्या सुबक मुर्ती देण्यात येतात, त्यांना गणेशोत्सव साजरा कसा करायचा यांबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येते व हा गणेशोत्सव आदिवासी व शहरी संस्कृतींमधील एकमेव दुव्याचे काम करतो. रायगड जिल्हयात तब्बल ४२ ठिकाणी हा गणेशोत्सव अलोट प्रतिसादात व तुडूंब उत्साहामध्ये साजरा केला जातो. याशिवाय अनेक आदिवासी पाडयांमध्ये या समितीने प्राथमिक शाळा व संस्कारवर्गसुध्दा सुरु केले आहेत. यात मुलांना गोळा करुन त्यांना वेगवेगळे खेळ शिकवले जातात, त्यांना निरनिराळे श्लोक व स्तोत्रे शिकवून त्यांच्यावर चांगले संस्कार केले जातात. वेगवेगळया विषयांवर त्यांना माहिती देऊन त्यांची ज्ञानपोकळी बुजवली जाते, त्यांना शिस्तीचे व समाजात वावरण्याचे मुलभूत नियम शिकवले जातात, तसेच त्यांची राहण्याची पध्दत व बोलण्याचा ढंग सुधारण्याविषयी मार्गदर्शन केले जाते. पण हे सर्व करताना त्यांच्या सांस्कृतिक वारसाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते. या शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये भाषेचा मुख्य अडथळा असतो परंतु बरेचदा या समितीचे कार्यकर्तेच या आदिवास्यांची भाषा शिकून घेतात.

जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत (काही अॅक्टिव्हिटीज)

१) भुकंपग्रस्तांसाठी लातूर येथे १० वी पर्यंत निवासी गाळा.२) घाटकोपरला एक अभ्यासिका जिथे बालवाडीपासून ते Law किंवा MBA करणारे विद्यार्थी आपापला अभ्यास करतात.३) प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व सारासार विचार करण्याची कला रुजावी यासाठी फिरती विज्ञान प्रयोगशाळा. या शाळेमध्ये सर्व प्रयोगांचं साहित्य दिलेलं असतं, एक कार्यकर्ता दुचाकीवरुन दररोज २० ते २५ गावं पालथी घालतो, तेथील मुलं जमवून त्यांना विज्ञानाची गोडी लावतो, निरनिराळे प्रयोग त्यांना करुन दाखवतो व त्यांचा अर्थसुध्दा समजावून सांगतो. ४) महाराष्ट्रात समितीच्या ७ ते ८ रक्तपेढया आहेत. अतिशय तत्पर व सफाईदार सेवा पुरवून अपघातग्रस्तांना नवसंजीवनी देत आहेत.५) आपत्तीग्रस्तांना (भूकंपग्रस्त) समितीतर्फे खाऊ, धान्य, भांडी कपडे इ.साहित्य पुरवलं जातं. महाडला दरड कोसळली होती तेव्हा समितीच्या कार्यकर्त्यांनी आपत्तीग्रस्तांना त्यांच्या पुनर्वसनापासून ते पुनर्जीवनापर्यंतची प्रत्येक मदत केली होती.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..