१९४९ _१९५० सालचा काळ होता तो, नासिक जवळील संसरी या टुमदार गावातील वास्तव्य.मला स्पष्ट पणे आठवते. देवळाली कॅम्पातुन नंतर जवळच्या संसरी गावी आम्ही रहायला गेल्याचे आठवते. तेथील शाळा गावच्या मारोती मंदिराच्या पडवित अथवा जोडुन असलेल्या पारावर भरत असे.
तेथेच लांब कोट घातलेले, झुपकेदार मिशा असलेले गुरूजी (पंतोजी) आम्हाला शिक्षक होते. हातात छडी घेऊन विध्यार्थ्यांच्या दोन ओळीतुन चक्कर मारता मारता उजळणी ची घोकण करुन घेत असत.
संसरीच्या तीन चार आठवणी अध्याप जाग्या आहेत. एक आहे गावातील बोहड्याची. त्या बोहाड्यांत अस्वलाची नक्कल करुन नाचणारा एक गावकरी काकांचा (काका म्हणजे आमचे वडील. त्यांना आम्ही काका म्हणत असु.) मित्र होता कारण त्याचा अस्वलाचाचा पेहराव काकांनी शिऊन दिला होता. व तो त्या दिवशी बोहाड्यांत नाचणार होता. व काकांनी त्यांस सांगीतले होते की मुलाला( मला) उचलुन घे व नाच. मलाही गंमत वाटु लागली. वा मज्जा येणार रात्र कधि होते वाट पाहु लागलो. बोहाडा सुरू झाला गल्लीत घराच्या समोरच उभे राहून बोहाडा बघत असत. ही गर्दी उसळली. टेंभ्याच्या प्रकाशांत व ताशा च्या आवाजात एक एक सोंग गल्लीतुन येऊ लागले. गणपती आले, सरस्वती आली. आंबाबाई. हणमंत, असे एक एक देव दानव येउ लागले. मी वाट पहात होतो अस्वल कधी येते व मला ऊचलुन घेऊन नाचते कधी. मीत्र मंडळी ही माझे कडे आसुयेने पहात कधी एकदा अस्वल येऊन याला उचलुन घेते असे चेहेरे करुन वाट पाहत होते. अन एकदाचे अस्वल येतांना दिसले. फार आनंद झाला. ते जसजसे पुढे येत होते माझा आनंद व उत्साह वाढत होता. एकदाचे ते मी उभा असलेल्या ठिकाणी आले व नाचु लागले. मला वाटले आता माझ्या जवळ येईल व मला उचलुन घेईल.. मी वाट पहात होतो. बराच वेळ गेला. त्या ठिकाणी बराच वेळ नाचले नाचले व हळुहळु पुढे निघुन गेले… मला तर रडुच कोसळले. मित्रांचे चेहेरे प्रश्रांर्थक बनले. मी सरळ घरांत निघुन आलो. अंथरुणावर गप्प पडुन राहिलो.
सकाळी काकांना विचारले मला त्या अस्वलाने का नाही उचलले. त्यांना कांही सांगता येईना. दुपारी ते अस्वलाचे सोंग घेणारे काळाच दुकानात आले. वडिलांनी विचारले अरे याला उचलुन नाचविले नाहीस? ते म्हणाले हा पुढे आलाच नाही. टेंभ्याच्या प्रकाशांत काहिच कळत नाही चेहरे स्पष्ट दिसत नाही.
हा पुढे आला असतां व हात उंचावून समोर उभा राहिला असता तर मला कळलं असते. तरी मी तुमच्या घरा समोर बराच वेळ नाचलो व वाट पहात होतो.
तेथील स्वातंत्र्य दिवसाची प्रभात फेरी व झेंडा वंदनातील अवर्णनीय उत्साह व आनंद अजुनही स्पष्ट दिसतो उत्साह वाढवतो.
संसारी वरून कॉंग्रेस चे १९५० चे आधिवेशन बघण्यासाठी नासिक आत्ता चे उपनगर) बैलगाडी ने गेलोलो आठवते अनेक मुलं व शिक्षक ही होते.तेथील मुख्य प्रवेशद्वारावरचे पं. नेहरुंचे उंच भव्य कट आउट अध्यापही नजरे समोर आहे.
त्यानंतर चव्हाटा नासिक ला. नंतर कथडा येथे वास्तव्य. नंतर भद्रकाली कारंजा समोरच्या गाढवे मॅन्शन ला वास्तव्य. साधारण पणे दुसरी ते चौथी पर्यंत पोलीस लाईन नासिक ला शिक्षण.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणी आहेत.
कर्फ्यू व हडताळ लहान वयांत अनुभवले आहेत.
भास्कर पवार
Leave a Reply