नवीन लेखन...

मेडीकल येथिक्स !

अमेरिकेतील अरीझोना स्टेट मधील फिनिक्स हे सुंदर व प्रशस्त  वसलेले शहर. स्वछता शिस्त व नियमांचे काटेकोर पालन ह्याचा अनुभव  तीव्रतेने  तेथील वास्त्व्यात आला. प्रत्येक संस्थांचे नियम  असतात  ते सहसा मोडले जात नाहीत.  तेथे एक मजेदार अनुभव आला.

मुलगा एका कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे  आम्ही दोघे गेलो होतो. त्याची बायको अर्थात माझी सून गर्भवती होती. सात  महिने झालेले. त्याच शहरात नजीकच्या मोठ्या रुग्णालयात तिची रीतसर नोंदणी केलेली होती. संबंधित स्त्री डॉक्टर  तज्ञाकडून नियमित तपासणी केली जात असे. एक दिवस सुनेच्या  पोटात दुखू लागले. आम्ही सर्वजन बेचैन  झालो.  तिला रुग्णालयात घेऊन जाऊ लागलो. रस्त्यातच त्या स्त्री डॉक्टर तज्ञाची  कन्सल्टिंग रूम  लागल्यामुळे,  मुलाने तातडी म्हणून ( Emergency ) तेथेच  तपासण्याकरिता नेण्याचा निर्णय घेतला. स्वागत कक्षात मुलगा  Receptionist  ला    भेटला. आम्ही बाहेरच्या खोलीत बसलो. Reseptionist एक वेगळ्याच विचाराची स्त्री असल्याचे जाणवले.  आमची पूर्व भेट वेळ  (Appointment)    घेतलेली नव्हती. शियाय त्यांच्या  पद्धती नुसार जर काही  यातना होत असतील तर  प्रत्येकाने रुग्णालयाच्या  Emergency विभागात  रुग्णाला घेऊन जाणे, जेथे तेथील डॉक्टर  ती केस  प्रथम   बघतील, जर गरज  पडली  तरच तज्ञाला कळवतील. Consulting  रूममध्ये असल्या केसेस  तपासत  नाहीत. आम्ही फार बेचैन झालो. ती आमचा व त्या तज्ञ डॉक्टरांची  भेट देण्यास  विरोध करीत होती. नियमाच्या चाकोरी मधून तिचे वागणे खरे असले  तरी परिस्थिती, आपत्कालची  वेळ, आणि माणुसकी याचा विचार ह्याला  अनुसरून ते अयोग्य होते. आमच्या आग्रही विचाराना मर्यादा होत्या. शेवटी आम्ही रुग्णालयात जाण्याचा निर्णय  घेतला.

आम्ही जात असताना एक विचार माझ्या मनांत आला. मी एकटाच त्या Receptionist कडे गेलो. “  We are  going  to  the Hospital. Will you Please  give this my I – card to Doctor  Madam. असे म्हणत, मी  माझ्या जवळचे ओळख कार्ड तिला दिले. मी एक  डॉक्टर बालरोग तज्ञ असून  त्यावर भारता मधला पत्ता होता. तिने ते कार्ड वाचताच तिच्या  मानसिक  विचारात बदल झालेला जाणवला. ” Please wait for a while  “  म्हणत ती ते कार्ड घेऊन डॉक्टरबाई कडे गेली. एकदमच वातावरण बदलले दिसले. कार्ड वाचून मी देखील एक तिचाच व्यवसायीबंधू असल्याचे डॉक्टराना कळले.

डॉक्टर स्वत: बाहेर आली, माझ्याशी हस्तोंदल केले. माझा परीचय करून  घेतला. स्वत: चा परिचय संक्षिप्त दिला. स्वागतमय वातावरण निर्माण झाले. आता डॉक्टरबाईनीच  लक्ष घातल्यामुळे सर्व व्यवस्थित झाले. सुनेला तपासून औषधी  लिहून दिली गेली.

हयालाच म्हणतात मेडिकल एयेथिक्स  ( Medical Ethics ). अर्थात् वैद्यकिय क्षेत्रातील लोकांची आपापसात वागण्याची पद्धत. (Moral principles or practices in medical fields ) वैद्यकीय शास्त्र अथंग पसरलेले आहे. त्याच्या अनेक शाखा, उपशाखा, ह्या वाढतच आहे. शिवाय हे बद्लत  जाणारे  वा दर दिवशी  ज्यात  नाविन्याचा शिरकाव होत होता.  त्यामूळे त्या क्षेत्रातिल सततचा सम्पर्क,  वैचारिक देवान घेवान अत्यन्त महत्वाची ठरते. ह्याच तत्वावर वैद्यकीय व्यासाय मधल्या व्यक्ती भेटताच, एकमेका विषयी आदराची भावना उत्पन्न होते. मग हे भारतात असो   इतर देशात असो. मेडिकल एथिक्स  म्हणतात ते ह्यालाच.   

— डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..