नवीन लेखन...

माणसाचे जमिनीवर असणे

जीवनात चढ -उतार येतच असतात , सुखातल्या जीवाला संकटाची झळ बसते , तर दुखाने होरपळून गेलेल्याला सुखाची सुखद शीतल सावली  मिळून जाते. अशा नित्य बदलत्या प्रसंगात माणसाची एक प्रकारे परीक्षाच होत असते.

भल्या भल्या माणसांना अशा वेळी स्वतःला नियंत्रित ठेवणे जमू शकत नाही, म्हणूनच आपल्या सभोवतालची असलेली मित्र मंडळी अपेक्षा करीत असतात की-  अशा बिकट  प्रसंगी आपले जमिनीवर असणे खूप महत्वाचे असते.

लहान असो व मोठा , गरीब असो वा श्रीमंत .प्रत्येकाला  जीवनात  नेहमीच यश आणि अपयश या दोन गोष्टींशी सामना करावा लागतो . अशा प्रसंगांना सामोरे जातांना ,एखाद्या संकटाशी सामना करतांना यश किंवा अपयश पदरात पडते   मग यशाने दिलेली हुलकावणी आणि अपयश  स्वीकारणे कठीण जात असते कारण अपयश ” ही  भावना कुणाच्याही  मनास वेदना देणारी असते. यात भर म्हणजे “आपल्या वाट्याला आलेल्या अपयशाचे खापर “नेहमी इतरांच्या माथी फोडणे ” ,अपयशाचे दुखः उगाळीत बसणे” ,हा कित्येकांचा आवडता उद्योग असतो .”गम्मत म्हणजे ,अशी माणसे आपल्या सहवासात असतात , काहीच प्रयत्न  न करता खूप काही मिळावे .! अशी इच्छा असणार्याला यश कसे मिळेल ? असे तुम्ही म्हणाल , पण अशा व्यक्तीला याचा सोयीस्करपणे विसर पडत असतो .अपयशाचे धनी होणे कुणालाच आवडत नसते

यशाची धुंदी  आणि विजयाची नशा माणसाला  हवी हवीशी वाटणारी गोष्ट आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे” ,याचा अर्थ आजकालच्या मिळणार्या प्रसिद्धीच्या झोताने  कळून येतो आहे . लोकांच्या नजरेत भरण्यासाठी ” टीव्ही आणि त्यावरील शो” अगदी सोपे आणि सहजसाध्य माध्यम झालेले  आहे. प्रसिद्धीच्या झोतात येणे “, ग्लैमरच्या दुनियेत वावरण्यास मिळणे , चाहते मिळणे ,त्यांचे प्रेम मिळणे ”

स्वप्नवत वाटणाऱ्या या गोष्टी अचानक वाट्यास येतात आणि “पतंग आकाशात उंच उंच भिरभीरु लागतो “, माणसाचे पाय जमिनीवर नसतात ” याचे उदाहरण पहावयास मिळते .नेमक्या अश्या वेळी “जो भानावर राहून जमिनीवर राहू शकतो ” त्याला या “वैभवाचा मोह” दूर दूर सारणे जमून जाते , या उलट अनेकांचे होते .यशाची धुंदी ,यशाचे वारे अंगात भिनले की .आपल्या माणसापासून दूर दूर जात आहोत “याचे भान रहात नाही ,आणि हे जग तर उगवत्या सूर्यास नमस्कार करणारे आहे” , मावळतीचे दिवस कठोर जाणीव देतात आणि आकाशात विहरणारा -एक दिवस पुन्हा त्याच जमिनीवर येऊन आदळतो .फार कठीण असते हे सारे .जो तरला -तो यातून सहीसलामत सुटला “असे म्हणूया .

श्रीमंती आणि गरिबी या दोन अवस्था  दुरावा निर्माण करणाऱ्या आहेत .जो श्रीमंत असतो..त्याला आपल्या वैभवाचा आणि श्रीमंत असण्याचा गर्व ,वृथाअभिमान असेल तर काय उपयोग त्याच्या श्रीमंतीचा ? कारण आपल्या भोवती अशी खूप श्रीमंत माणसे असतात की जी  कधीच  -गरीब-श्रीमंत असा भेद न करता सगळ्यांशी मिळूनमिसळून वागतात ,त्यांच्या माणुसकीच्या व्यवहारात “पैशांची भाषा “कधी बोलली जात नाही ,अशा माणसांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात “असे लोक म्हणतात .हा त्या श्रीमंत व्यक्तीचा गौरवच असतो.

काही व्यक्ती अशाही असतात की ज्यांच्यासाठी त्यांचे सर्वस्व फक्त पैसा “असतो, जगातील सगळ्या गोष्टी पैश्याने विकत घेता येतात “अस त्यांचा पक्का विस्वास असतो .याच गुर्मीत ते जगत असतात ,पण दुर्दैवाने यांचे दिवस बदलून गेले की मग मात्र “जमिनीवर पाय असते तर ? याची जाणीव होऊ लागते ,पण आता खूप उशीर झालेला असतो.

सारासार बुद्धीची देणगी मिळालेली असतांना “विचारशक्ती गमावून बसणार्यांना समजावून सांगणारे भेटले पाहिजे. आणि अशा अनुभवी माणसांनी सांगितले पाहिजे की ”

बाबा रे ,जमिनीवर रहात जा ” यातच तुझे भले आहे.

— अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- ९८५०१७७३४२ .
ई-साप्ताहिक – जनमंगल.
दि.१२-७-२०२० अंकात पूर्वप्रकाशित लेख

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..