नवीन लेखन...

देशबुडव्याला “भारतरत्न”?

 
सचिनचे कौतुक आणि क्रिकेटची नशा लोकांसाठी वेदनाशामक औषधीचे काम करते. क्रिकेटची ही धुंदी, क्रिकेटचे हे गारूड जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून उतरत नाही आणि त्याला “भारतरत्न” देण्यात येऊ नये याकरिता आंदोलन करीत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, फेसबुक किंवा इंटरनेटद्वारे या विरोधात जनजागृती करीत नाहीत तोपर्यंत हा देश सुधरू

शकणार नाही.

आपल्या देशात बाकी सगळे महाग होत असले तरी सरकारी पुरस्कार मात्र कमालीचे स्वस्त होत आहेत. हे पुरस्कार देताना कोणतेही निकष लावले जात नाहीत किंवा कोणते निकष लावले जातात ते तो पुरस्कार देणारेच जाणोत. एखाद्याला एखादा पुरस्कार का दिला जातो, सरकारी पुरस्कारांच्या बाबतीत तर सगळा सावळा गोंधळच आहे. हे पुरस्कार “मॅनेज” केले जातात. ते कसे मॅनेज करायचे हे पुरस्काराच्या प्रतिष्ठेवर जगणार्‍यांना चांगले ठाऊक आहे. त्यासाठी कायम चर्चेत राहण्याची कला काही लोकांना चांगली साधली आहे. केवळ आपल्या बोलघेवडेपणामुळे राष्ट्रीय लोकप्रियता प्राप्त करणार्‍यांची या देशात कमतरता नाही. लालुप्रसाद यादव हे त्याचे चांगले उदाहरण ठरू शकते. आपल्या खास बिहारी शैलीतील हिंदीने लोकांना आकर्षित करणार्‍या लालूंनी कर्तृत्वाची पाटी तशी कोरीच असताना थेट पंतप्रधान पदावर डोळा ठेवण्याइतपत राजकीय उंची गाठली होती. सध्या ते राजकीय विजनवासात असले तरी आपल्या याच भांडवलाच्या जोरावर ते पुन्हा नव्या उमेदीने परतू शकतात. इथे बोलक्याची बोंडे विकली जातात. त्यासाठी पदरी भाट बाळगले जातात. आधुनिक भाषेत त्याला मीडिया मॅनेजमेंट वगैरे म्हणतात, त्यासाठी पीआर एजन्सीची (पब्लिक रिलेशन एजन्सी) मदत घेतली जाते. आजकाल अशा एजन्सींचा धंदा खूप जोरात सुरू आहे. लालू यादव, रामदेव बाबा, अण्णा हजारे, दिग्विजय सिंग, कपिल सिब्बल, सचिन तेंडुलकर सारखे लोक आपल्या पीआर एजन्सीच्या इशार्‍यावर वेगवेगळी वक्तव्ये करीत असतात किंवा त्यांचे सार्वजनिक वर्तन या एजन्सींच्या सल्ल्यानुसारच होत असते. एक बाब वारंवार स्पष्ट झाली आहे, की या देशातल्या लोकांना नशेत राहायची सवय आहे; मग ती नशा राजकारणाची असो, सट्टा-जुगाराची असो अथवा क्रिकेटसारख्या तद्दन फालतू खेळाची असो, लोकांना नशेत राहायला आवडते आणि त्याचाच फायदा
या क्षेत्रातले दिग्गज घेत असतात. त्याचे ताजे उदाहरण म्हणून सचिनला “भारतरत्न” प्रदान करण्यासाठी सरकार स्तरावर चाललेल्या धडपडीचा उल्लेख करावा लागेल. सचिन जो खेळ खेळतो तो खेळ मूळात खेळ राहिलेलाच नाही. सामने खेळणार्‍या आणि सामने आयोजित करणार्‍यांसाठी तो एक धंदा झाला आहे. काल-परवापर्यंत या धंद्यात थोडीफार नीतीमत्ता होती, खेळाडू देशासाठी खेळत होते, आता तीही शिल्लक राहिली नाही. आंतरराष्ट्रीय सट्टेबाज सामन्याचे निकाल ठरवतात आणि खेळाडू त्यांच्या इशार्‍यावर नाचतात. लोकांना बेवकूफ बनविणारा हा खेळ खरेतर देशातून हद्दपार करायला हवा किंवा त्यावर बंदी तरी घालायला हवी; परंतु क्रिकेट या देशाचा धर्म आहे आणि सचिन तेंडुलकर देव आहे आणि हा दावा केवळ रिकामचोट क्रिकेटप्रेमींचाच नाही तर या देशाचे मायबाप सरकारदेखील हेच सांगत आहे, अन्यथा केवळ सचिनला “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करता यावे म्हणून या पुरस्काराच्या श्रेणीत विशेष सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतलाच नसता.सचिनला भारतरत्न देण्यात या पुरस्काराच्या निकषाची अडचण येत होती म्हणून सरकारने हे निकषच बदलवून टाकले आहे. तसा प्रस्तावच केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे आणि पंतप्रधान कार्यालयाचेही त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, यात शंका नाही. खरेतर केंद्रीय गृहमंत्रालयापुढे इतर अनेक प्रश्न प्रलंबित असताना, विशेषत: मुंबई बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह लावले जात असताना, या मंत्रालयाने आपल्या कामात अधिक लक्ष घालणे अपेक्षित होते; परंतु भारतीय लोकांची मानसिकता अचूक ओळखणार्‍या राजकारण्यांनी केवळ लोकांचे मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्या श्रद्धेला म्हणजे क्रिकेट प्रेमाला हात घातला आणि कोणत ीही गर
नसताना सचिनला भारतरत्न देण्यामागचा अडथळा दूर केला.

खरे तर शेतकर्‍यांची पिळवणूक करणारा सावकार विरोधी सक्षम कायदा मागील 5 वर्षांपासून केंद्रात धूळ खात पडलाय मात्र त्याचा पाठपुरावा करायला ना राज्य सरकारला वेळ ना केंद्र सरकारला वेळ. लोकांचे क्रिकेटवरचे हे प्रेम राजकारणाचा धंदा करणार्‍या नेत्यांनाही आकर्षित करीत आहे आणि म्हणूनच विलासराव देशमुखांनी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली आणि जिंकली. त्यांनी या देशाचा माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरचा पराभव केला. खरेतर सचिनने क्रिकेटच्या भल्यासाठी किंवा राजकारण्यांनी या क्षेत्रात येऊन घाण पसरवू नये म्हणून तरी दिलीप वेंगसरकरच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला हवे होते. सचिनने पाठिंबा दिला असता तर वेंगसरकर सहज निवडून आले असते; परंतु वेंगसरकर भविष्यात आपल्या उपयोगी पडू शकणार नाहीत, विलासराव देशमुखांसारखे राजकारणीच आपल्या कामी पडतील याची चाणाक्ष सचिनला जाणीव झाली असेल. एकूण काय तर या देशातील काही लोक क्रिकेटसाठी इतके वेडे आहेत की त्यापुढे त्यांना इतर कोणत्याही प्रश्नांची चिंता वाटत नाही, हे राजकारण्यांना, सरकारला ठाऊक असल्यामुळेच अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने सचिनला भारतरत्न देण्याची चर्चा सुरू केली असावी, असे दिसते. या चर्चेमुळे महागाई, दहशतवादी हल्ले, भ्रष्टाचार अशा सगळ्या समस्यांकडे लोकांचे सहज दुर्लक्ष होऊ शकते आणि तसे होतही आहे. मुंबई बॉम्ब स्फोटापेक्षा अधिक चर्चा आता सचिनच्या भारतरत्नची किंवा त्याच्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय शतकाची होत आहे. सचिनला “भारतरत्न” बहाल केले की क्रिकेटप्रेमी जनता खुश होईल आणि आपल्या नाकर्तेपणावरचा जनतेचा राग कमी होईल, हे साधे गणित सरकारने मांडलेले दिसते आणि सरकारचे हे गणित योग्य ठरणार यात शंका नाही, कारण आमच्या देशातील काही विश िष्ट जनतेल
क्रिकेटपेक्षा अधिक महत्त्व कशाचेही नाही. सचिनला “भारतरत्न” पुरस्कार द्यावा की

नाही, हा मुद्दा जितका वादाचा आहे तितकाच वादाचा मुद्दा हादेखील आहे की यासंदर्भात इतक्या तातडीने हालचाली करण्याची गरजच काय होती? आजपर्यंत क्रीडा क्षेत्रातील कामगिरी “भारतरत्न” या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी पात्र समजली जात नव्हती. तो सरकारचा धोरणात्मक निर्णय होता आणि त्यामुळेच सचिनच्या तुलनेत कित्येक पटींनी अधिक गौरवास्पद कामगिरी करणार्‍या अनेक क्रीडापटूंना या सन्मानापासून वंचित राहावे लागले. सचिन क्रिकेट सारख्या देशबुडव्या खेळाचे प्रतिनिधित्व करतो. त्यात भलेही त्याचा पराक्रम खूप मोठा असेल; परंतु त्याचवेळी हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे एकट्या सचिनने भारताला गौरव प्राप्त करून दिला असे म्हणणे त्याच्यासोबत खेळणार्‍या इतर खेळाडूंवर अन्याय करण्यासारखे ठरेल. इतर दहा खेळाडूंच्या मदतीशिवाय, त्यांच्या त्यागाशिवाय सचिनला हा पराक्रम करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे सांघिक यशाचे श्रेय कुणा एकाच्या शिरावर बांधणे हेच मुळी चुकीचे आहे, शिवाय “भारतरत्न” या पुरस्काराचा विचार करताना संबंधित व्यक्तीने या देशाच्या भल्यासाठी, देशातील लोकांच्या भल्यासाठी किती त्याग केला, किती समर्पण केले, त्याचा देशाला किती फायदा झाला, समाजाला किती फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो किंवा तसा केला जात असावा, ही अपेक्षा आहे. या सगळ्या निकषांवर कोट्यावधीची मिळकत असलेला सचिन केवळ कर चुकविण्यासाठी जाहिरातीत आपण अभिनय करतो म्हणून आपल्याला कर सवलत मिळावी, असे म्हणत असेल तर कसा पात्र ठरू शकेल? सचिनने आपल्या मुलासाठी फ्लॅट घेताना काही लाखांचे कर्ज काढले. कर्ज काढून घर घ्यावे लागण्याइतकी गरिबी सचिनवर आली आहे का? हे केवळ ्याने करातू
न सवलत मिळण्यासाठीच केले ना? विदेशातून भेट मिळालेली आणि म्हणून कस्टम ड्युटी न भरता भारतात आणलेली महागडी फेरारी कार त्याने विकली, भेट म्हणून मिळालेली वस्तु विकून त्याचे पैसे करणारा सचिन कोणत्या व्याख्येत देशभक्त ठरतो. ही महागडी कार त्याला कुणी भेट दिली असेल, असे मला वाटत नाही. केवळ सरकारची कस्टम ड्युटी चुकविण्यासाठी आपल्या कर सल्लागाराने दिलेल्या सल्ल्यानुसार त्याने ही कार भेट म्हणून मिळाल्याचे सांगितले किंवा तसे कागदपत्रे तयार करून घेतले. ही कार भारतात विकून त्याने पैसा कमावला. कस्टम ड्युटी माफ करून देशात आणलेली वस्तु विकता कशी येते आणि विकली जात असेल तर साध्या साध्या गोष्टीसाठी सामान्य लोकांना छळणार्‍या कस्टम विभागाने सचिनकडून आता नक्कीच कस्टम ड्युटी वसूल करायला पाहिजे. वास्तविक आपले जितके उत्पन्न आहे त्यावर तितका कर भरणे हे कोणत्याही जबाबदार नागरिकाचे कर्तव्य ठरते, कारण याच करातून गरिबांच्या विकासाच्या अनेक योजना सरकार राबवित असते. हा कर चुकविण्याचा प्रयत्न म्हणजे देशाप्रती बेजबाबदारपणा म्हणता येणार नाही का? मध्यंतरी सचिनला आपल्या नव्या बंगल्यात जीम बांधण्यासाठी बांधकामाचे चटई क्षेत्र वाढवून हवे होते. मीडियामध्ये बोंब झाली म्हणून त्याला ही परवानगी मिळाली नाही. कदाचित त्याची कसर महाराष्ट्र सरकारने सचिनचे नाव भारतरत्न पुरस्कारासाठी सुचवून भरून काढली असावी. सचिन अनेक संस्थांना मदत वगैरे करतो; परंतु आज आपल्या समाजात असे शेकडो लोक आहेत की ज्यांची आमदनी काहीच नसताना त्यांनी आपले उभे आयुष्य गरिबांच्या, पिडितांच्या कल्याणासाठी वाहून घेतले आहे. त्यांची सरकारने कधी दखल घेतली नाही; परंतु सचिनला “भारतरत्न” देण्यासाठी मात्र सरकार केविलवाणी धडपड करीत आहे. सरकार सचिनला भारतरत्न देवो अथवा न देवा इथल्या सुजा लोकांनी आपल्या
पिढ्या न पिढ्या बरबाद करणार्‍या या खेळाचा नायक म्हणून सचिनला देशबुडव्या हा खिताब द्यायला हरकत नाही. हा पुरस्कार अगदी समारंभपूर्वक देण्यात यावा, वाटल्यास तिथे सचिनला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी. सरकार लोकांना मुर्ख बनवित आहे आणि लोकदेखील आनंदाने मुर्ख बनत आहेत. सचिनच्या शतकाचा गजर लोकांना आतंकवाद्यांच्या बॉम्बस्फोटापेक्षा मोठा वाटतो. सचिनचे कौतुक आणि क्रिकेटची नशा लोकांसाठी वेदनाशामक औषधीचे काम करते. क्रिकेटची ही धुंदी, क्रिकेटचे हे गारूड जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून उतरत नाही आणि त्याला “भारतरत्न” देण्यात येऊ नये याकरिता आंदोलन करीत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, फेसबुक किंवा इंटरनेटद्वारे या विरोधात जनजागृती करीत नाहीत तोपर्यंत हा देश सुधरू शकणार नाही.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..