जाग्रद्दृष्ट्वा स्थूलपदार्थानथ मायां
दृष्ट्वा स्वप्नेऽथापि सुषुप्तौ सुखनिद्राम्।
इत्यात्मानं वीक्ष्य मुदास्ते च तुरीये
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१६।।
जीवाचा चार अवस्थांचा विचार शास्त्रात मांडलेला आहे. त्या चार अवस्थेत आपले वर्तन कसे असावे हेच या श्लोकाच्या निमित्ताने आचार्य श्री वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
जाग्रद्दृष्ट्वा स्थूलपदार्थानथ मायां- जागृतावस्थेत स्थूल पदार्थांना पाहून माया समजावे.
पंचज्ञानेंद्रिय यांच्या आधारे बाह्य सृष्टीचा अनुभव घेत असल्याच्या अवस्थेला जागृतावस्था असे म्हणतात.
या अवस्थेत आपल्याला या जगातील विविध पदार्थांचा अनुभव येतो.
हा सगळा अनुभव शेवटी मायामय आहे असा विचार ज्ञानी करतात.
येथे या सगळ्याला मायामय म्हण याचा मूळ उद्देश ही सर्व सुखाची साधने टिकाऊ नाहीत.
एक तर त्या साधनांचा लोप होतो किंवा त्या साधनांचा द्वारे आनंद घेणाऱ्या इंद्रियांच्या क्षमता क्षीण होतात.
दृष्ट्वा स्वप्नेऽथापि – स्वप्न अवस्थेमध्ये देखील आपण असेच पाहतो. सूक्ष्म देहाचा द्वारे अंतर्गत स्वरूपात होणाऱ्या दर्शनाला स्वप्न असे म्हणतात.
त्याचे मिथ्या स्वरूप उठता क्षणी लक्षात येते.
सुषुप्तौ सुखनिद्राम् – तिसरी अवस्था असते गाढ निद्रा. याला शास्त्रात सुषुप्ती असे म्हणतात. यात बाई आणि अंतर्गत अशा दोन्ही दर्शनांचा लोप होतो.
इत्यात्मानं वीक्ष्य मुदास्ते च तुरीये – अशा सर्व स्वरूपात मीच दर्शन घेणारा आहे, अशा स्वरूपात तुरीय अवस्थेत ज्याच्या चैतन्याने सर्व जाणले जाते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीविष्णूंची मी स्तुती करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply