सत्यं ज्ञानं शुद्धमनन्तं व्यतिरिक्तं
शान्तं गूढं निष्कलमानन्दमनन्यम्।
इत्याहादौ यं वरुणोऽसौ भृगवेऽजं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१९।।
श्रुती प्रामाण्य हा भारतीय दर्शनाचा अत्यंत महत्त्वाचा विषय. आपण मांडत असलेल्या कोणत्याही भूमिकेला श्रुतीचा म्हणजे वेदाचा, उपनिषदाचा आधार दिला की मग अन्य काही सांगण्याची त्यांना आवश्यकताच वाटत नाही.
श्रुती वाक्य हे अंतिम वाक्य आहे. त्याचा आधार हा अंतिम सिद्धांत आहे.
याच भूमिकेवरून आपण स्तोत्रात मांडत असलेली भूमिका हीच कशी श्रुती प्रतिपादित भूमिका आहे हे सांगण्यासाठी भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज येथे तैतिरीय उपनिषदातील संवादाचा आधार घेत आहेत.
तेथे आलेल्या वरुण भृगू संवादात देखील परमात्म्याच्या याच एकमेव स्वरूपाचे वर्णन कसे आले आहे? ते सांगताना आचार्य श्री म्हणतात,
सत्यं – परम सत्य अर्थात स्थल-काल इत्यादी कशाचाही बंधनात नसलेले.
ज्ञानं – ज्ञान ,चैतन्य हेच स्वरूप असलेले.
शुद्धम् – माया मल विरहित
अनन्तं – परमव्यापक, शाश्वत चिरंतन.
व्यतिरिक्तं – तीन गुणांच्या पलीकडे असलेले.
शान्तं – कशाचीही अपेक्षा नसल्याने आत्ममग्न.
गूढं – बाह्य इंद्रियांनी जाणण्यास अशक्य.
निष्कलम् – शुद्ध
आनन्दम – आनंदरूप
अनन्यम् – एकमेवाद्वितीय
इत्याहादौ – असे सुरुवातीला सांगितले
यं – ज्या तत्वाबद्दल.
वरुणोऽसौ भृगवे – भगवान वरुणांनी महर्षी भृगूंना
अजं – परम अशाश्वत ,
अशा ज्या परब्रह्म परमात्मा तत्त्व स्वरूपात ज्यांचा उपदेश केला,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा नाश करणाऱ्या भगवान श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply