नवीन लेखन...

सुप्रजनन – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

दो या तीन बस – सुमारे तीस वर्षापूर्वी प्रचलित असलेले घोषवाक्य

हम दो हमारे दो – सुमारे वीस वर्षापूर्वी प्रचलित असलेले घोषवाक्य एक कुटुंब: एक अपत्य – गेल्या दहा वर्षापासून प्रचलित असलेले घोषवाक्य

भारताची लोकसंख्या बेसुमार वाढत आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने ही घोषवाक्य काळानुसार रचली गेली. सध्या सुशिक्षित वर्गात एक अपत्य किंवा फार तर दुसरे अपत्य असते असे प्रत्यक्षात आढळते. क्वचित प्रसंगी मनोवृत्ती पण दिसून येते. म्हणजे शिवाय सरोगसी पण आता प्रचलित होऊ लागली आहे. ऐहिक सुखांच्या उपभोगासाठी मुले न होऊ देण्याची ही प्रवृत्ती निसर्गचक्राच्या विरुद्ध आहे. सध्या प्रचलित असलेल्या एक कुटुंब: एक अपत्य ही मानसिकता पाहता, प्रत्येक दाम्पत्यास आपले होणारे अपत्य अगदी राजकुमार किंवा राजकुमारीच असावी अशी अपेक्षा असते. त्यासाठी हे दाम्पत्य स्वतः राजा राणी म्हणजेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्यसंपन्न असणे आवश्यक नाही का?

सुप्रजनन काळाची गरज

पूर्वीचा आणि सध्याचा काळ ह्यात जीवनशैलीच्या अनुषंगाने अनेक बदल झालेले दिसतात. त्यानुसार सुप्रजनन ही काळाची गरज होत आहे. सद्य स्थितीत सुप्रजननाचे महत्व व आवश्यकता तपासून पाहणे नितांत गरजेचे आहे. आता ह्या विषयाच्या अंतर्गत येणारे मुद्दे क्रमाक्रमाने बघूया.

बालसंगोपन – पूर्वीच्या एकत्र कुटुंब पध्दतीत मुलांचे बालपण, संगोपन, संस्कार, शिक्षण ह्याकडे मातापित्यांना विशेष लक्ष देण्याची गरज भासत नव्हती. कुटुंबाची ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी ही जबाबदारी सहज पार पाडीत. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत मात्र ह्या जबाबदाऱ्या अडचणी म्हणून प्रकर्षाने जाणवतात. प्रत्येक क्षेत्रात चढाओढ व यशप्राप्तीसाठी अग्रस्थानी असण्याची निकड आता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांना सामोरे जाण्यासाठी काही ठोस मार्ग आखणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे जन्माला येणारे मूल सर्वप्रकारे सुदृढ, सशक्त, निकोप व सर्वगुणसंपन्न असण्याची गरज पूर्वीच्या तुलनेत अधिक भासते आहे.

गर्भधारणेचे वय – आयुर्वेदिक ग्रंथामध्ये लग्नासाठी मुलीचे वय सोळा वर्ष तर मुलाचे वय वीस वर्ष असावे असे वर्णन केले आहे. ह्या वयाला समत्वागतवीर्य म्हटले आहे. म्हणजेच ह्या वयात विवाह होऊन गर्भधारणा झाली तर स्त्री व पुरुषाचे दोष-धातु सर्वात्तम स्थितीत असल्याने निकोप गर्भधारणेची शक्यता सर्वात जास्त असते. जसजसे वय वाढते तसतसे शरीरात दोषांचे संतुलन बदलत जाते व गर्भधारणेच्या दृष्टीने थोड कठीण परिस्थिती उत्पन्न होउ लागते. कायद्याची वयोमर्यादा, शिक्षणाचा कालावधी, आर्थिक स्थैर्य, विभक्त कुटुंब पद्धती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता विवाहाचे वय काळाच्या ओघाने आपोआपच वाढत जात आहे. व त्याचा परिणाम स्त्री-पुरुषांच्या प्रजनन संस्थेवर होतो व पर्यायाने पुढच्या पिढीवर सुध्दा.

आहाराच्या सवयी – होळी झाल्यानंतर आइस्क्रीम खावे असे पूर्वी वडीलमंडळी मुलांना सांगत. आईस्क्रीम बनवणारी दुकाने/हॉटेल्स पण अगदी तुरळक असायची ती पण फक्त उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आता बारा महिने तेरा काळ आइस्क्रीम, थंड पेये, फास्ट फूड अशा पदार्थांचे वारेमाप सेवन चालू असते. त्यावर कुठलेही बंधन नाही. आहारात अस्सल घरगुती पदार्थ आता हळूहळू कमी होऊन त्यांची जागा आता फास्टफूड, जंकफूड ह्यांनी व्यापली आहे. त्यांची निर्माण पध्दती, त्यातील प्रिझर्व्हेटिव्ह, रंजक द्रव्य जेनेटिकली मॉडिफाइड पदार्थ ह्याचबरोबर अति प्रमाणात मद्यपान, धुम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन हे जननक्षमतेवर आघात करते. हे दूरगामी परिणाम कालांतराने ध्यानात येतील. कदाचित तेव्हा खूप उशीर झालेला असेल.

विद्युतचुंबकीय लहरी – मोबाईल, मोबाईल टॉवर, ब्ल्यू टूथ, लॅपटॉप, टेलीव्हिजन, ओटोकॉप, फ्लुरोसंट दिवे, वायफाय, मायक्रोवेव्ह अशा अनेक उपकरणांचा वापर दिवसेदिवस प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यांची उपयुक्तता अनन्यसाधारण आहे. म्हणूनच लोकप्रियता वाढत आहे. परंतू त्यापासून उत्पन्न होणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचा प्रजनन यंत्रणेवर गंभीर दुष्परिणाम होतो. दैनंदिन जीवनात ह्याचे उदाहरण आपण बघू शकतो. गेल्या काही वर्षात चिमण्या जवळजवळ दिसेनाशा झाल्या आहेत. ह्या चिमण्या रस्त्यात मरून पडल्याचे कधी कोणाच्या पाहण्यात नाही मात्र त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विद्युतचुंबकीय किरणोत्सर्जनामुळे चिमण्यांचे जननक्षमता नाहीशी झाली व संख्या रोडावत गेली. ह्या किरणोत्सर्जनाचा परिणाम मानवी जननयंत्रणेवर देखील होतो.

व्यायामाचा अभाव – वाहतुकीच्या सुविधा, पोहण्यासाठी स्वच्छ नद्या किंवा तलाव नाहीत. स्विमिंग पूल जवळपास असतातच असे नाही. मैदानी खेळ खेळण्यासाठी मोकळया जागा शिल्लक नाहीत. क्रिकेट सारखे खेळ लोकप्रिय होत आहेत ज्यात खेळाडूंना थोडाफार व्यायाम होतो पण बघत बसणारे लोक मात्र आपला बहुमूल्य वेळ शीतपेयांचा आस्वाद घेण्यात आणि वायफळ खादडण्यात दवडतात. शिफ्ट ड्युटीजमुळे झोपेमुळे झोपेचे ताळतंत्र विस्कळीत होते. रात्री जागरण झाल्यामूळे दिवसा झोपणे, त्यामुळे व्यायामाला वेळ उरत नाही. बालवयात अभ्यासात बेसुमार चढाओढव त्यासाठी ढोरमेहनत त्यामुळे व्यायामासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. घरी बसल्याबसल्या कॉम्प्युटर गेम्स तेवढे खेळले जातात. ह्या सर्व कारणांमुळे व्यायामाचा अभाव होऊन लहान वयात मेदरोग व मधुमेहासारखे आजार होण्याचे प्रमाण बेसुमार वाढत जात आहे. पुढे तारुण्यात ह्याचा परिणाम प्रजननक्षमतेवर होतो हे स्पष्ट होऊ लागले आहे.

औषध सेवनाचा परिणाम काही औषधे प्रजननक्षमता कमी करतात केवळ आधुनिक रासायनिक औषधेच नव्हे तर वनस्पतीजन्य औषधांमुळे देखील असे परिणाम होऊ शकतात. जसे कडुनिंब, कारले, पपईच्या बिया, सदाफुली, कपाशीचे तेल सतत व दीर्घकाळ सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या व गती कमी होते. क्लोरोक्विन तसेच अपामार्ग, गुंजा, वज्रदंती, मिरे अशा काही वनस्पतींमुळे स्त्रीबीज स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतात. आधुनिक वैद्यक शास्त्रातील काही औषधे जननयंत्रणेवर घातक परिणाम करतात. उदा. टेस्टोस्टेरॉन बाहेरुन शरीरात प्रविष्ट केल्याने शुक्रजनन करण्याची शरीराची यंत्रणा निकामी होऊ लागते. काही कष्ट न करता रेडीमेड मिळाले तर शरीराला ही सवय जडते. मासिक रज:स्राव पुढे ढकलण्यासाठी हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतल्या जातात. अशा गोळ्या वारंवार घेण्यामुळे हॉर्मोन्सचे संतुलन बिघडते व प्रजननक्षमतेवर घातक परिणाम होतात. रक्तदाब नियंत्रण करणारी काही औषधे, काही अँटीफंगल औषधे, प्रोस्टेटवर कार्य करणारी काही औषधे व केसांच्या वाढीसाठी दिली जाणारी काही औषधे विविध प्रकाराने प्रजनन शक्तीवर विपरीत परिणाम करतात.

उपरोक्त सर्व कारणांचा आढावा घेतल्यास आपल्या लक्षात येते की सुप्रजननासाठी काही ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. ह्या सर्व गोष्टी काळानुसार मानवाच्या दैनंदिन आयुष्यात प्रवेश करीत आहेत आणि जननक्षमता तसेच सुप्रजननाच्या दृष्टीने ह्यांचा विचार करणे अविभाज्य आहे. तील काही समस्यांवर मनुष्य उपाय करु शकतो तर काही समस्यांवर कोणताही तोडगा सापडणे शक्य नाही. विभक्त कुटुंब पध्दतीत बदल करणे वैयक्तिक पातळीवर अवलंबून आहे. ठराविक वयात लग्न होणे हे काहीशा प्रमाणात नशिबावर अवलंबून आहे. तरीदेखील हेतुपुरस्पर उशीर होऊ देऊ नये. स्थ्याच्या दृष्टीने आहारात बदल करणे मात्र नक्कीच पल्या हातात आहे. शास्त्रशुद्ध पध्दतीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आहारात योग्य तो बदल करावा.

पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज ( पी सी ओ डी ) हा तरुण मुलींना सतावणारा व वंध्यत्वास कारणीभूत असलेला विकार आहे. हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्याने गेल्या १५ ते २० वर्षात हा आजार अधिक प्रमाणात फोफावलेला दिसतो. हा हॉर्मोनल इंम्बॅलन्स नजीकच्या काळातच का अधिक दिसू लागला? बाईल फोन्सचा वाढता वापर व टॉवरचे वाढते जाळे हे त्याचे एक प्रमुख कारण आहे.

विद्युत चुंबकीय लहरींच्या आघाताने होणारे दुष्परिणाम हा एक मोठा विषय आहे. अशा उपकरणांपासून दूर राहणे आता शक्य नाही. दैनंदिन जीवनात ह्या उपकरणांचा इतका सर्रास वापर होत आहे की त्याशिवाय जगणे आता कोणलाही शक्य नाही. एक्सरे लहरींपासून अपाय होऊ नये म्हणून शिशाचा एप्रन घालावा लागतो. विद्युत चुंबकीय लहरींपासून संरक्षण करण्याची क्षमता ह्यात नक्कीच आहे. परंतु एक्सरे साठी लागणारा वेळ हा फक्त काही सेकंद असल्यामुळे हा एप्रन घालता येतो. विद्युतचुंबकीय लहरींचा आघात मात्र सतत चोवीस तास चालू असतो, त्यापासून बचाव कसा करणार? आयुर्वेदाने ह्या विषयावर हजारो वर्षापूर्वी चिंतन करुन त्यावर मात करण्याची संकल्पना मांडली आहे. विशेषतः गर्भावस्थेत ह्या लहरींचा परिणाम गर्भासाठी किती घातक होऊ शकतो ह्याचे ज्ञान ऋषिमुनींना ( मी तर ह्यांना एन्शियंट सायंटिस्ट म्हणतो ) होते व त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी विशिष्ट वनस्पतींचा उल्लेखही केला आहे. १६ ते १८ वनस्पतींनी समृध्द असलेल्या ह्या औषधाचा उपयोग सुयोग्य गर्भधारणा होण्यासाठी संतती होण्याचा संकल्प केल्यापासून करण्याचा शास्त्रादेश आहे. हेच औषध पुढे संपूर्ण गर्भावस्थेत विद्युतचुंबकीय लहरींचे दुष्परिणाम रोखण्याचे कार्य करण्यास समर्थ आहे. मूळ ग्रंथात ह्या औषधाच्या गुणाबद्दल वर्णन करताना ग्रहघ्न देह वर्धन असा उल्लेख आहे. अर्थात ग्रंथकर्त्यांना ग्रहताऱ्यांपासून उत्पन्न होणारे किरणोत्सर्जन ह्याठिकाणी अपेक्षित असल्याचे दिसते. र्करोगाच्या पेशींचा संहार केला जातो. त्याचा परिणाम शरीराच्या अन्य निरोगी पेशींवर देखील होतो रेडिएशन चिकित्सा करण्यापूर्वी विशिष्ट वनस्पतींचे सेवन केल्याने ह्या घातक लहरींचे निरोगी पेशींवर होणारे दुष्परिणाम ८७ टक्के पर्यंत प्रतिबंधित केले जाऊ शकतात असे निष्कर्ष संशोधनात आढळतात. पुढे ह्या विषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

प्रजननासाठी व्यायामाचे महत्त्व एका जुन्या दंतकथेतून सारांशरूपाने वर्णन केलेले दिसते. रघुवंशातील दिलीप राजाला सर्वप्रकारची सुखसमृध्दी आणि ऐश्वर्य असूनही संतान सुख नसल्यामुळे जीवनात नैराश्य होते. सुखासीन आयुष्य, अव्यायाम, पौष्टिक व मिष्टान्न सेवन अशा कारणांमुळे व्यायाम होत नसे व त्यामुळे शरीरात मेदाच्या पुढे कोणत्याच धातूला पोषण मिळत नसे. वसिष्ठ मुनींनी राजा राणीला नंदिनी गायीची सेवा करण्यास सांगितले. ती जाईल तिथे जावे. गाय खाईल तेच खावे. गायीचे दूध सेवन करावे असे सांगितले. ह्याचा मथितार्थ असा की गायीबरोबर रानावनात फिरावे. सुखासीन न राहता, चालणे फिरणे करावे, व्यायाम घडावा, गाय खाईल तेच खावे. णजे हाय फायबर असलेला आहार घ्यावा, मिष्टान्न सेवन बंद करून हलका आहार घ्यावा ज्याने मेद वाढणार नाही. त्यामुळे चरबी हटून जननक्षमता सुधारेल. गायीच्या दुधात कमी स्निग्धांश असल्याने चरबी वाढत नाही. असे ह्यातून निष्कर्ष काढणे शास्त्रीय आहे.

औषध सेवनाबद्दल काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात आवाजवी औषधांच्या सेवनामुळे ननक्षमतेवर विपरीत परिणाम होतात. मुळे लहानसहान लक्षणांसाठी औषधांचा भडिमार करणे टाळले पाहिजे. आहारातून काही चुकीचे किंवा अवाजवी सेवन केले गेले तर जुलाब किंवा उलट्या होतात. म्हणजेच हे दोष आपणहून बाहेर टाकण्याचा शरीर प्रयत्न करते. अशावेळी जुलाब उलट्या थांबवण्यासाठी तातडीचे उपाय केले तर ते दोष शरीरातच साठून राहतील व आणखीन काहीतरी उपद्रव निर्माण करतील. शिवाय औषधाचे काही दुष्परिणाम होतील ते निराळेच. डोळ्यात कचरा गेल्यावर अश्रूंचा ओघ वाढतो आणि कचरा वाहून टाकण्यास हातभार लागतो अशी ही संकल्पना आहे. काही औषधांची मात्र टाळाटाळ करणे योग्य नाही. जीवाला धोका पोचू शकतो.

मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन तसेच अन्य मादक ड्रग्सचा वापर हा केवळ प्रजननासाठीच नव्हे तर सर्वच प्रकारे शरीराची हानी करता व रोगप्रतिकारशक्तीचा ऱ्हास करतो.

सुप्रजननासाठी पहिली पायरी – पंचकर्म
स्त्री व पुरुषाच्या शरीरातून उत्तम दर्जाचे, सामर्थ्यवान व निर्दोष बीज निर्माण होण्यासाठी पंचकर्माच्या सहाय्याने शरीर खऱ्या अर्थाने शुध्द करणे जरुरीचे असते. गर्भधारणेच्या प्रक्रियेत पुरुषबीजाचे स्त्रीबीजाबरोबर मिलन घडून गर्भधारणा होते म्हणजेच स्त्री शरीरात हा एक नवीन पाहुणा येतो. आपल्या घरी कोणी पाहुणा येणार असेल त्यावेळी आपण घराची जशी स्वच्छता करतो, सर्व वस्तू आपापल्या जागी ठेवतो, फ्लॉवर पॉट सजवतो, पडदे, चादरी बदलतो तसेच सर्व काही ह्या पाहुण्यासाठी पण केले तर पाहुणा आनंदित होणारच. येणारा पाहुणा सुध्दा जर आनंदी स्वभावाचा, निरोगी, मनमिळावू व स्वच्छ असेल तर भेटीचा आनंद द्विगुणित होतो. दररोज मल-मूत्र साफ होत असले तरी सुध्दा अशी शुद्धी का करावी असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच येईल. घरी दररोज झाडझूड करूनही आपण सणासुदीला जेव्हा कपाटे, पलंग व अडगळीच्या जागा स्वच्छ करण्यास सुरुवात करतो त्यावेळी लक्षात येते की अशा ठिकाणी किती घाण साठली आहे ही स्वच्छता जर अशा प्रसंगी केली नाही तर त्याचे अनिष्ट परिणाम पुढे नक्कीच पहावयास मिळतात. उत्तम दर्जाचा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी सर्वप्रथम भांडी स्वच्छ असणे आवश्यक आहे तसाच हा प्रकार समजावा.

फलधारणा झाल्यावर फलकोशात कोणत्याही प्रकारचा दोष असेल तर बहुधा शरीर आपणहूनच त्याचा त्याग करून गर्भस्राव घडवते. डोळ्यातील कचरा ज्याप्रमाणे अश्रूंच्या स्रावाबरोबर बाहेर फेकला जातो तसाच हा प्रकार आहे. गर्भस्राव झालेल्या ९० टक्के रुग्णांच्या स्रवित द्रवाचे गुणसूत्रांच्या दृष्टीने विश्लेषण केले असता बीजकोष सदोष असल्याचे निदर्शनास येते. त्यातूनही गर्भधारणा सफल झालीच तर क्लीबता (तृतीयपंथी/ नपुंसकता) निर्माण होते. होणारी संतती अशक्त, विद्रुप, अल्पायुषी अशी होते. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मेंदू, हृदय अशा अति महत्वाच्या संस्थांची वाढ खुंटते आणि विविध विकृती निर्माण होतात. आधुनिक वैद्यकानुसार अशा लक्षण समुच्चयांचे नामकरण डाउन्स सिंड्रोम, टरनर्स सिंड्रोम, एंजलमन सिंड्रोम, क्रि डू चाट सिंड्रोम, फजाईल एक्स सिंड्रोम, क्लिनफेल्टर सिंड्रोम असे केले जाते.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता. वातदोषाच्या निर्हरणासाठी बस्ति, कफासाठी वमन, पित्तासाठी विरेचनाबरोरच जरुरीनुसार रक्तमोक्षण, तर शरीरातील सर्व अन्तःस्रावी ग्रंथींचे नियंत्रण करणाऱ्या पिट्युटरी ग्रंथींच्या संतुलनासाठी नस्य हे पंचकर्माचे स्वरूप आहे. पंचकर्मात बस्ति चिकित्सेचे विशेष महत्व आहे. बस्ति म्हणजे गुदमार्गाने औषधी तेले व काढे प्रविष्ट करणे. ह्याने आतड्यातील मळाचे खडे सैल होऊन बाहेर पडतात व वायु मोकळा होतो. त्यामुळे बीजकोष, बीजवाहीनी व गर्भाशयाला पोषक घटक पुरविणाऱ्या रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होऊन रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो. म्हणून पंचकर्मातील किमान नस्य व बस्ति चिकित्सा दाम्पत्याने जरूर करावी. ही चिकित्सा यशदायी ठरून बीजदोषांचे नियंत्रण करते, बीजाची परिपक्वता नियत वेळात साधली जाते व संपूर्ण गर्भावस्थेत गर्भिणीची रोगप्रतिकारक्षमता उत्तम राखली जाते. ह्याच बरोबर यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी हरळी जातीच्या दूर्वा रसाचे ५-६ थेंब दररोज नाकात टाकण्याचे वर्णन केवळ आयुर्वेदातच नव्हे तर वेदांमध्ये देखील आहे. गर्भधारणेचा निश्चय केल्यावर स्त्रीने हे नस्य जरूर चालू करावे.

पंचकर्म चिकित्सा स्वत:च्या मनाने करणे चूक आहे. त्याचे जसे लाभ आहेत तसेच चुकीच्या पध्दतीने केले तर होणारे परिणाम देखील गंभीर आहेत. तज्ज्ञ व अनुभवी वैद्यांच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्माचा अवलंब करावा. पुस्तकात किंवा अन्यत्र व वाचून आपल्या मनाने पंचकर्म करण्याचा विचारही करू नये.

गर्भधारणेचा निश्चय पक्का झाल्यावर दाम्पत्याने ही शरीरशुध्दी करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांची भेट घेऊन पंचकर्म चिकित्सेची तयारी करावी. सुदैवाने आजकाल अगदी लहान-मोठ्या गावातही आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा केंद्रांची दालने उघडली आहेत त्यामुळे उत्तम संतती प्राप्तीसाठी आवश्यक असलेली पहिली पायरी ह्या सर्व ठिकाणी उपलब्ध आहे.

औषधार चिकित्सा – पूर्वपीठिका
सुश्राव्य संगीत, सुविचार, आहारविहारातील चांगल्या सवयी, शास्त्रशुध्द व्यायाम पद्धती, चांगले वाचन, चिंतन-मनन ह्या सर्व गोष्टींचा विचार गर्भसंस्कार विषयात केला जातो व त्यांचे सुयोग्य परिणाम गर्भावर दिसून येतात. वनस्पती व प्राणी ह्या निसर्गाने निर्माण केलेल्या दोन प्रकारच्या जीवसृष्टी एकमेकांना पूरक आहेत. श्वसनासाठी प्राणवायु, पोषणासाठी अन्न घटक वनस्पतींच्या माध्यमातून प्राण्यांना प्राप्त होतात तर प्राण्यांचे मल-मूत्र वनस्पतींच्या पोषणासाठी खताच्या स्वरूपात उत्तम असतात. म्हणूनच वनस्पतींच्या शास्त्रशुध्द मिश्रणातून निर्माण होणारे औषधी कल्प मानवाच्या स्वास्थ्य रक्षणासाठी व रोग निवारणासाठी उत्तम प्रकारे कार्य करतात. आयुर्वेदात सुप्रजनन ह्या विषयावर यथासांग विचार करून काही विशेष वनस्पतीजन्य औषधी कल्प योजना नमूद केली आहे.

डॉ. संतोष जळूकर

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..