तपसाधना करूनी मिळवी, सत्वगुणाची शक्ती अंगी ।
त्याच शक्तीच्या जोरावरती, स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।।
शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा, सारे सुख आणि भोग भोंवतीं ।
परिणामी तो फेकला जाऊनी, पुनरपी येई याच भूवरती ।।
एक दया दाखवी ईश्वर, वातावरणी देऊनी संधी ।
जन्म मिळे ते त्याच ठिकाणी, कमविले पुण्य ज्याने आधी ।।
चक्र खेळ हा चाले सदैव, स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा ।
अंतिम ध्येय तेच ठरते, मिळविणे क्षण तो मुक्तीचा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply