महाराष्ट्रात प्रदीर्घ लोकडाऊनच्या काळानंतर शाळा 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होतायत यामागचा मुख्य उद्देश मुलांचे वर्ष वाया न देणे व ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा समोर स्पस्ट झल्याने 10 नोव्हेंबर2020 चा शासन निर्णय काढून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली असली तरी महाराष्ट्रात शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप पर्यंत अस्पष्टता होती.
शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांना विश्वासात घेण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची व पालकांची असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली परिस्थिती पाहून राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला.
राज्यात टप्प्याटप्याने काही गोष्टी सुरू होत असताना शाळा सुरू होण्याबाबत मात्र संभ्रम कायम होता व आहे. 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शाळा सुरू झालेल्या नाहीत.
महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतर सुरू होणार का? सुरुवातीला केवळ नववी ते बारावी शाळा सुरू होतील का? शाळा सुरू करण्याला पालक आणि संस्थाचालकांची सहमती आहे का? शाळा सुरू होण्यास विलंब होत असल्याने पुढील शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सुरुवातीला पाहूयात 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना:
विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती करता येणार नाही.पालकांची लेखी परवानगीअसल्या शिवाय विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळणार नाही.कंटेनमेंट झोनमध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश मिळणार नाही. तसेच त्या भागातील शाळाही सुरू करता येणारनाहीत.
शाळांना आपतकालीन टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना
शाळेत येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. वर्गात विद्यार्थ्यांनाही मास्क लावावे लागणार.शाळा संस्थाचालकांनाशाळेतील प्रत्येक वस्तू सॅनिटाईज करणे बंधनकारकअसेल. उदा. शाळांमधील प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्ग, शौचालय, फर्निचर, पाण्याची टाकी शाळा आपल्या सोयीनुसार अभ्यासक्रम आणि वेळापत्रक तयार करू शकतात. यामध्ये सुट्ट्यांचाही समावेश असेल. यासाठी शाळांना NCERT च्या गाईडलाईन्स पाळाव्या लागतील.
शाळा सुरू झाल्यापासून 2-3 आठवडे परीक्षा घेता येणार नाहीत.
कोरोनानंतरची शाळा
महाराष्ट्रात दिवळीनंतर शाळा सुरू होणार?
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा दिवाळीनंतर सुरू होणार असे संकेत दिले होते. त्यावेळी त्या शाळांच्या संस्थाचालकांशी चर्चा करत होत्या.
केंद्र सरकारनेही शाळा सुरू करण्यासाठी आता नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार पालकांचे लेखी सहमती पत्र असल्याशिवाय विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी पालकांची परवानगी हे सर्वांत मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याने आणि शाळा सुरू करताना लहान मुलांची सुरक्षा धोक्यात येत असल्याने हा निर्णय घेणे शिक्षण विभागासाठीही जिकरीचे आहे.
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, “आमची शाळा सुरू करण्याची पूर्व तयारी झाली आहे. पण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये शाळा सुरू करता येणार नाहीत. पण दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची सरकारची मानसिकता आहे. सुरुवातीला केवळ नववी ते बारावीचे वर्ग सुरू होतील.”
महाराष्ट्रात आजही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणं महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला पाहिजे.प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
केंद्रीय शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली तरी प्रत्यक्षात शाळा सुरू करणे आणि त्या चालवणे हे आव्हानात्मक काम आहे.
कागदोपत्री कितीही नियम आणि सूचना तयार केल्या तरी स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करताना त्यात अनेक अडचणी आहेत.
पालकाचे लेखी संमती पत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाही अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. पण शाळेत एकाच वेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न शाळा संस्थाचालक आणि पालक दोघांकडूनही विचारला जातोय.
शहर आणि ग्रामीण भागातही सर्वच विद्यार्थी शाळेजवळ राहत नाहीत. अशावेळी सार्वजनिक वाहतूक किंवा स्कूल बसमधून विद्यार्थी प्रवास करतात.
विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षकांचाही मोठा प्रश्न आहे. एका शाळेत दहापेक्षा जास्त शिक्षक शिकवत असतात. एक शिक्षक दिवसभर 3-4 वर्गांमध्ये शिकवतो.
शाळा सुरू करण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक. सरकारनेही पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्याला शाळेत येण्याची सक्ती करता येणार नाही असे म्हटले आहे.
“महाविद्यालय आणि आयआयटी सारख्या संस्थांही अद्याप बंद आहेत. या शैक्षणिक वर्षात परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात किंवा काही ठिकाणी वेगळे प्रयोग करण्यात यावे असे आम्हाला वाटते. पण कोरोनाचा संसर्ग असताना शाळा सुरू करू नयेत असे बहुतांश पालकांचे म्हणणे आहे.
शैक्षणिक वर्ष धोक्यात
महाराष्ट्रात 15 जूनला शिक्षण सुरू झाले असले तरी शाळा बंद आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेता येत नाही असे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.
विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यातही अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता देखील खालावली आहे. एकूणच शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे.
नववी ते बारावीच्या परीक्षा कशा घेतल्या जातील? त्यासाठी अभ्यासक्रम कसा असेल? आणि दहावी,बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जातील का? असेही प्रश्न विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत.
शाळा सुरु करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाकडून खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत–
1)शालेय शिक्षण विभागाच्या दि 10 नोव्हेंबर 2020 च्या शासन परिपत्रकानुसार दि 23 नोव्हें 2020 पासून इयत्ता 9 ते 12 वर्गाची शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी दिलेल्या सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या मार्गदर्शक सूचनांचा कटाक्षाने अवलंब करावा.शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर करावयाच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांचे म्हणजेच परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब चे ऑनलाईन वाचन करण्यात आले.
2)सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची RT PCR कोविड टेस्ट शासकीय प्रयोगशाळेत दि.22 नोव्हेंबर अखेर तालुक्याने दिलेल्या नियोजनानुसार करून घ्यावी.
3)ज्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोविड टेस्ट चा रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल त्यांनाच शाळेत प्रवेश द्यावा.कोविड प्रमाणपत्राशिवाय इतर कोणालाही प्रवेश देऊ नये.शाळेत बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नये.
4)जे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येणार आहेत त्यांच्या पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे.पालकाचे संमतीपत्र असणाऱ्या पाल्यांनाच शाळेत प्रवेश द्यावा.*शाळेत येण्यासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला सक्ती करू नये*.विद्यार्थी आजारी असेल किंवा घरात कोणी आजारी असेल तर अशा विद्यार्थ्याला घरी थांबण्यास परवानगी द्यावी.
5)शाळा आणि परिसर निर्जंतुकीकरण करणे,थर्मल गन, सॅनिटायझर,ऑक्सिमिटर,हॅन्ड वॉश इ.सुविधेचा खर्च खाजगी शाळांनी /संस्थांनी करावा.
6)प्राधान्याने मुख्याध्यापक आणि किमान टीचिंगसाठी आवश्यक एक /दोन शिक्षक यांची कोविड टेस्ट करून रिपोर्ट मिळवावा म्हणजे शाळेच्या पूर्वतयारीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होईल.टप्प्याटप्प्याने सर्वांचीच कोविड टेस्ट करून घ्यावी.
7)टीचर्स-पॅरेन्ट्स असोसिएशन(शिक्षक-पालक संघ),शाळा समिती यांची ऑनलाईन मिटिंग घ्यावी , सर्वांना सुरक्षा विषयक उपाय योजनेतील मार्गदर्शक सूचना परिशिष्ट-अ आणि परिशिष्ट-ब बाबत अवगत करावे.पालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करावे.
8)सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनाही परिशिष्ट-अ आणि परिशिष्ट-ब मधील निर्देशांचे पालन करण्यासाठी सूचना द्याव्यात व त्याबाबत मार्गदर्शन करावे.
9)जे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांच्याही ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करून ते नियमित सुरू ठेवावे.
10)सुरक्षाविषयक सर्व उपाययोजनांची पूर्व तयारी झाल्यानंतरच शाळा प्रत्यक्ष सुरू करावी. दि.23 नोव्हेंबर पासून किंवा त्यानंतरच्या तारखेला आवश्यक ती पूर्व तयारी झाल्यानंतर शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय शाळांना घेता येईल.23 नोव्हेंबरलाच प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे बंधनकारक नाही.ज्या शाळांची पूर्वतयारी झाली असेल त्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करता येतील.मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी अशा सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.महिने होत आले तरीही शाळा बंद आहेत. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे.
धन्यवाद
— श्री चंद्रकांत धोंडी चव्हाण
पर्यवेक्षक,श्री वा.स.विद्यालय,माणगाव
chandrakantchavan205@gmail.com
Leave a Reply