शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी
विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी
शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी
झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी
काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला
रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला
रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती
नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती
खेळून भूक लागली, हा विचार आला मनी
जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना
शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत
भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत
मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं
जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी
परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते
बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते
निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना
जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply